मुनी निलेशचंद्रांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; जरांगे पाटलांचं नाव घेतलं, म्हणाले, RSS नसतं तर..
मुंबई : राज्यात एकीकडे नाशिक महाकुंभमेळ्याची तयारी सुरू असून दुसरीकडे ठिकठिकाणी हिंदू (Hindu) संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. भिवंडी तालुक्यातील कल्याण नजिकच्या बापगाव येथे मंगळवारी आयोजित केलेल्या हिंदू संमेलनात जैन मुनी निलेशचंद्र यांनी पुन्हा एकदा मुस्लिम धर्मियाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. जैन मुनी निलेशचंद्र यांनी काही दिवसांपूर्वी एका राजकीय व्यासपीठावर बोलताना नितेश राणेंची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केली होती, तसेच ते भविष्यात मुख्यमंत्री होतील, असेही वक्तव्य केले होते. त्यानंतर, नितेश राणेंनी स्वत: हे वक्तव्य मान्य नसल्याचं म्हटलं होतं. त्यातच, निलेशचंद्र यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चा रंगली आहे.
बाळासाहेब बोलून गेले होते फक्त टोपी घालणारा, तिलक लावणारा हिंदू नाही, तो कोठ्यावर बसल्यासारखा हिंदू आहे. जरांगे पाटील यांनी मला म्हटले की, मुनीचे मुनीर करुन टाकेल. पण तुम्ही जनता जाणता, तुमचं हिंदुत्व जाऊ दे काहीच्या ***. भाजपा सोडून द्या पण आरएसएसला बंदी घाला अशी मागणी करतात. अरे बाबा, आरएसएस नसता तर भारतात हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती. तुमच्या हातात काठी आहे, ती गांधींवाली काठी नाही तर आरएसएसची काठी आहे, असे वक्तव्य निलेशचंद्र यांनी केलं आहे. गांधींची लाठी लांड्यांना साथ देणारी होती पण ही काठी आरएसएसची आहे, जो भारताचा अपमान करेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करेल, त्यांना मारणारी ही काठी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाटक बघता आणि घरी जाऊन झोपून जाता. तुमच्या घरात ओरिजनल छावा पैदा करा, तेव्हा लांड्यांची वाट लागेल तशी लागणार नाही, अशा शब्दात जैन मुनींनी मुस्लिम समुदायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय.
माझ्यावर केस झाली तरी मी घाबरणार नाही
माझ्यावर आज केस झाली तरी मी घाबरणार नाही. आमचा समाज एसी हॉलमध्ये बसला आहे. मी फक्त सनातन धर्मासाठी येथे आलो आहे. जैन समाज हा वेगळा नाही, तर तोही एक सनातन परंपरेतील आहे, सर्व हिंदू आहेत. आपल्याकडील तलवारीला धार लावून ठेवा. संकल्प करा, दुर्गाडी किल्ल्यावरील आई भवानी मातेची शपथ घेऊ ,”माँ रक्ताने तेरा तिलक करेंगे यदी वहासे अतिक्रमण नही हटा तो **को वही गाडेंगे “असे प्रक्षोभक वक्तव्य जैन मुनींनी केले आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.