पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली

पुणे: कधी काळी शैक्षणिक पंढरी समजलं जाणाऱ्या पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून वाढती गुन्हेगारी चर्चेत आहे. दोनच दिवसांपूर्वी  पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari chinchwad) विषारी दारुमुळे 22 जणांचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. त्यानंतर, पोलिसांच्या (Police) कार्यक्षमतेवर आणि कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता, पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर परिसरात टपोरी पोराने मध्यरात्रीच्या सुमारास धक्कादायक पद्धतीने दहशत पसरवल्याचं पाहायला मिळालं. मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या एका टपोरी पोराने बेस बॉल स्टिकने कॉलेजसमोर उभी असलेल्या एका कारची नासधूस करत तोडफोड केली.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील ही वाढती गुन्हेगारी पोलिसांपुढे आव्हान ठरत असून पोलिसांचा धाक शहरातून कमी झाली की काय,असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या डी.वाय.पाटील कॉलेज समोर काल शनिवारी एका टपोरी मुलाने कारच्या काचांची तोडफोड केली. विशेष म्हणजे या तोडफोडीनंतर जवळील लोकांनाही स्टीकचा धाक दाखवून धमकी दिली, शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.

या घटनेत टपोरी पोरगा चारचाकी वाहन फोडत असतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. हा टपोरी अगदी शांतपणे एक्टिवा दुचाकीवर आला, त्यानंतर त्याने बेसबॉल स्टिकने चारचाकी वाहनांची तोडफोड केली. वाहनाची तोडफोड केल्यानंतर त्याने स्थानिक लोकांना बेसबॉल स्टिकने दमदाटी करून तो घटनास्थळावरुन पसार झाला. या प्रकरणात संबंधित कार मालकाने तुकाराम नगर पोलिसात टपोरी पोराविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

आणखी वाचा

Comments are closed.