15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या बॅटमध्ये AI चिप…; पाकिस्तानी क्रिकेट तज्ज्ञाचा दावा, क्रिकेट

बॅटमध्ये वैभव सूर्यवंशी एआय चिप : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या एकाच नावाची चर्चा आहे आणि ते नाव म्हणजे वैभव सूर्यवंशी. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी याने आपल्या बॅटने असा काही कहर केला आहे की, दिग्गज गोलंदाजांनाही आता मैदानावर कुठे चेंडू टाकावा, हे सुचेनासे झाले आहे. आता आयपीएल 2026 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अवघ्या 37 चेंडूत 103 धावा ठोकल्या आणि वैभवने आपल्या कारकिर्दीतील दुसरे आयपीएल शतक झळकावले.

बॅटमध्ये ‘AI चिप’ची चर्चा…

वैभवची ही फलंदाजी पाहून पाकिस्तानचे क्रिकेट तज्ज्ञ नौमान नियाझ यांनी मिश्किल भाषेत त्याचे कौतुक केले. नियाझ म्हणाले की, “या मुलाची बॅट तपासायला हवी. जशी WADA खेळाडूंची उत्तेजक चाचणी करते, तशी याच्या बॅटची लॅबमध्ये चाचणी करा. कदाचित त्याने बॅटमध्ये एखादी ‘AI चिप’ (AI Chip) वापरली असावी, कारण तो जे करतोय ते अवास्तव आहे.”

नियाझ पुढे म्हणाले, “जेव्हा तुम्ही 18 वर्षांचे असता, तेव्हा तुमचे शरीर स्नायू बनवते. पण हा मुलगा तर फक्त 15-16 वर्षांचा आहे. जेव्हा विराट कोहली विश्वविजेता बनला होता, तेव्हा याचा जन्म झाला होता. त्याच्याकडे फक्त ताकद नाही, तर अप्रतिम तंत्र आहे. तो 260 डिग्री कोनात फटकेबाजी करणारा एक खेळाडू आहे.”

विक्रमांचा पाऊस…

राजस्थान रॉयल्सकडून खेळताना वैभवने या हंगामात आतापर्यंत 8 सामन्यांत 44.62 च्या सरासरीने 357 धावा ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याचा स्ट्राईक रेट 234.87 असा थक्क करणारा आहे. सध्या तो स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अंडर-19 विश्वचषकाचा ‘हिरो’

आयपीएलमध्ये येण्यापूर्वी वैभवने 2026 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात 80 चेंडूत 175 धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला सहावे जेतेपद मिळवून दिले होते. तेव्हापासूनच त्याला भारतीय क्रिकेटचा भावी सुपरस्टार मानले जात आहे.

हे ही वाचा –

Vaibhav Sooryavanshi Video : एका फोटोची किंमत 100 रुपये…; वैभव सूर्यवंशीने जे केलं, ते पाहून चाहतेही हादरले, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.