वनडेमध्ये रोहितसोबत वैभव सूर्यवंशीने ओपनिंग करावी, माजी दिग्गजांची मागणी
15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला आता वनडे क्रिकेटमध्ये खेळवण्याची मागणी होत आहे. वैभव इंग्लंडमध्ये जरी फ्लॉप ठरला असला, तरी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी२० मालिकेत त्याने अपेक्षेनुसार कामगिरी केली. तो सर्वाधिक धावा करून ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा (मालिकावीर) मानकरीही ठरला. तीन सामन्यांमध्ये वैभवने 9 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 151 धावा केल्या. यानंतर भारताच्या माजी दिग्गजाने त्याला वनडेमध्ये रोहित शर्मासोबत ओपनिंग (सलामीला) पाठवण्याची मागणी केली आहे.
भारताचे माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनिअर यांचे असे मानणे आहे की, 2027 च्या वनडे विश्वचषकाचा विचार करता वैभव सूर्यवंशीचा रोहित शर्मासोबत सलामीवीर म्हणून वनडे संघात समावेश केला पाहिजे. रोहितसोबत डावाची सुरुवात करणारा शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, ज्यामुळे मधल्या फळीला आणखी मजबूती मिळेल, असे त्यांना वाटते.
इंजिनिअर यांनी ‘पीटीआय’ (PTI) या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, “आदर्श परिस्थिती शुभमन गिल आणि वैभव सूर्यवंशी यांची आहे. गिल हा एक उत्तम खेळाडू आहे. माझ्या मते गिल सध्याच्या घडीला संघातील सर्वोत्तम फलंदाज आहे, त्यामुळे गिलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आले पाहिजे. गिल हवेत फटके मारत नाही. याशिवाय वनडेमध्ये डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजांची (Left-Right combination) जोडी आदर्श ठरेल. माझे असे मानणे आहे की, रोहितने संघात राहिले पाहिजे आणि त्याने सूर्यवंशीसोबत डावाची सुरुवात केली पाहिजे.”
इंजिनिअर पुढे म्हणाले, “वैभव सूर्यवंशी हा डावाची सुरुवात करण्यासाठी योग्य खेळाडू आहे. विराट कोहली तिसऱ्या आणि शुभमन गिल चौथ्या क्रमांकावर येऊ शकतो. यामुळे भारताची फलंदाजी देखील मजबूत होईल.” वैभव सूर्यवंशीला वनडे संघात समाविष्ट करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे इंजिनिअर यांनी पुढे सांगितले.
Comments are closed.