मी मंत्र्याचा OSD, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही म्हणणारा कारंडे अडचणीत; आता सावेंचं मोठं पा
पुणे : भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) विजय धुलचंद कारंडे यांच्या विरोधात पुण्यात (Pune Crime News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावेंचे ओएसडी विजय धुलचंद कारंडे यांनी त्यांच्या पत्नीला मारहाण करून तिचा गळा दाबून (Pune Crime News) खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कारंडे यांनी आपल्या लहान मुलालाही बॅटने बेदम मारहाण केल्याचाही पत्नीचा आरोप आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी नवीन गार्डन या त्यांच्या निवासस्थानी ही घटना घडली असल्याचं समोर आलं.(Pune Crime News) तर या घटनेनंतर आता मंत्री अतुल सावे यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पत्नीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी विजय धुलचंद कारंडे यांची चौकशी होणार आहे. कारंडेच्या पत्नीची तक्रार अत्यंत धक्कादायक व वेदनादायी असल्याचे सावेंनी म्हटलं आहे.
Atul Save Post: अतुल सावे यांची सोशल मिडीयावरती पोस्ट…
मंत्री अतुल सावे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट करत याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “विजय कारंडे विरोधात त्याच्या पत्नीने दाखल केलेली तक्रार अत्यंत धक्कादायक व वेदनादायी आहे. या घटनेची त्वरित चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, आमच्या भगिनीस न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आपले महायुती सरकार हे महिला संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी आग्रही असते. या प्रकरणातही दोषीस कठोरतम शिक्षा मिळावी यासाठी वेगवान कार्यवाही होईल. महिलांवरील अन्याय आणि अत्याचार करणाऱ्या हीन प्रवृत्तींचा आम्ही कायम निषेध करतो आणि अशा कोणत्याही अधिकाऱ्यांना कोणतीही जबाबदारी किवा स्थान असणार नाही, याविषयी आश्वस्त करतो”, असं पोस्टमध्ये अतुल सावेंनी म्हटलं आहे.
Atul Save OSD: ‘मी मंत्र्याचा ओएसडी, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही’
विजय कारंडेच्या पीडित पत्नीने एबीपी माझाशी बोलताना त्यांच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली. मी मंत्र्याचा ओएसडी माझा कोणी काहीही बिघडवू शकत नाही म्हणत पत्नीला धमकी दिली. त्याचबरोबर पत्नीला बेदम मारहाण केली. पत्नीच्या हातापायावर काळे निळे डाग पडले होते. मंत्री अतुल सावे यांचे ओएसडी विजय कारंडे यांनी स्वतःच्याच पत्नीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर मुलाला देखील मारहाण केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या पत्नीने मोबाईलचा पासवर्ड मागितला याचा त्यांना राग आला आणि त्यानंतर त्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. तीन वर्षांपासून अतुल सावे यांच्याकडे ते ओएसडी म्हणून काम करतात अशी माहिती समोर आली आहे.
पत्नीला सोबत मुंबईत घेऊन गेले नाही. मुलांनाही पुण्यातच ठेवलेलं. त्यामुळे पत्नीला संशयाला आणि त्यांनी मोबाईलच्या पासवर्ड बाबत विचारणा केली होती. याचाच राग मनात धरून मारहाण केली आहे. सोबतच मी मंत्र्याचा ओएसडी आहे, माझं कोणी काहीही बिघडवू शकत नाही असं म्हणत पत्नीला आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देखील दिली. हा सगळा त्रास झाल्यानंतर पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि विजय कारंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी विजय कारंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या विजय कारंडे यांचा पोलीस शोध घेत आहे. पत्नीच्या वडिलांना देखील धमक्या देऊन त्यांच्याकडून 25 लाख रुपयांची मागणी केल्याचे देखील पत्नीच्या वडिलांनी सांगितलं आहे.
Atul Save OSD: नेमकं काय घडलं?
क्वीन्स गार्डन निवासस्थानी पत्नीने कारंडे यांच्या मोबाईलमधील काही चॅटबाबत विचारणा केली आणि मोबाईलचा पासवर्ड मागितला. याचा राग कारंडे यांना आला आणि ते संतापले. त्यानंतर त्यांनी पत्नीला बॅटने मारहाण करायला सुरुवात केली. फक्त मारलंच नाही तर पत्नीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा ही आरोप आहे. आपल्या आईला वाचवण्यासाठी कारंडे यांचा मुलगा भांडणाच्या मध्ये गेला मात्र कारंडे यांनी त्याच्यावरही बॅटने मारहाण केल्याचं तक्रारीत म्हटले आहे. या सगळ्या प्रकारानंतर पत्नी आणि मुलगा दोघेही स्वतःचा जीव वाचून घराबाहेर पडले.(Pune Crime News) त्यानंतर त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि विजय कारंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्या तक्रारी वरून पुण्यातील कोरेगाव पार्क पोलिसांनी खून करण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक दुखापत करणं, धमकी देणं यावरून गुन्हा दाखल केला आहे.
— अतुल सावे (@save_atul) 6 मे 2026
आणखी वाचा
Comments are closed.