पती म्हणायचा, भारतात नको…इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्य
विनायक राऊत सून गिरीजा राऊत मराठी बातम्या: ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shivsena UBT) ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), त्यांचा मुलगा आणि मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक गितेश राऊत (Gitesh Raut) यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामध्ये कौटुंबिक छळासोबतच ‘जादूटोणा विरोधी कायद्यान्वये’ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांवर ठाण्याच्या कापूरबावडी पोलिस ठाण्यात राऊतांच्याच सुनेने गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये भोंदूबाबाचाही सहभाग असून एका भोंदूबाबाला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. गिरीजा राऊत यांनी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीत पती गितेश राऊतांसह त्यांच्या कुटुंबीयांवर अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.
माझी सासू माझा नवरा घरी असताना व तो घरी नसल्यास पूर्णतः वेगळी वागायची. प्रत्येक गोष्टीत मला टोमणे मारुन, माझ्या घरच्या बद्दल घालून पाडून बोलून मला मानसिक त्रास यायची. आमच्या नात्यात दुरावा येण्यासाठी व आमच्यात क्लेश होण्यासाठी तिचा मोठा सहभाग आहे. माझा पती हा मला मासिक पाळी कधी येईल त्याबाबत सर्व माहिती त्याच्या फोनवर नोंद करून ठेवत होता व माझी पुढची मासिक पाळी अमुक तारखेला येईल, असा विकृतपणे बागत होता. तसेच N.C.R.B (एन.सी.आर.बी) त्याचेवडील, विनायक राऊत, हे खासदार असल्याने त्यांचे कोणते न कोणते कार्यक्रम सतत चालू होते. त्यावेळी सदर कार्यक्रमाला अडचण नको म्हणून माझी सासू, शामल राऊत व गितेश राऊत हे मला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास भरीस पाडत होते. त्यामुळे माझी मासिक पाळी दर महिन्याला लांबून मला त्रास होत होता, असं गिरीजा राऊत यांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. (Vinayak Raut Marathi News)
विनायक राऊतांच्या सूनेचे हादरवणारे आरोप, पोलिसांच्या तक्रारीत काय काय? (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut)
लग्नानंतर देवदर्शनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मी व गितेश राऊत हनीमूनसाठी ऊटी येथे गेलो होतो.ऊटी येथे एकूण 6 दिवस राहिलो असता गितेश माझ्या सोबत शारीरिक संबंध न ठेवता माझ्यापासून दूर राहिला होता. त्याबाबत मी त्याला विचारले की तू असा का वागत आहेस, तुझा काही प्रॉब्लेम आहे का? त्यावेळी त्याने मला मेंटल कनेक्ट होणे गरजेचे आहे. शारीरिक संबंध लग्नात अजिबात महत्वाचे नाहीत, मला हनीमूनचा कंटाळा येतो असे सर्व बोलून मला टाळू लागला. ऊटीवरून मुंबईला आल्यानंतर गावी होणा-या आमच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आम्ही मुळगावी – तळगाव, मालवण येथे जाण्यास निघालो. त्यावेळी आम्ही पालीच्या गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. त्यावेळी गितेश हा गाडीतून उतरून पुढे चालू लागला. मी साडी घातल्याने व अंगावर दागिने असल्याने मला चालण्यास उशीर होऊ लागल्याने त्याने मला सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांसमोर तुला कुठे घेऊन जायची तुझी लायकी नाही असे सर्व बोलून गलीच्छ भाषेत अपमानित केले होते. प्रत्येक वेळेस गितेशने कधीही भांडण सुरु केल्यास आजूबाजूचा परिसर, भाषा, वेळ-काळ, माझ्या भावना ह्याचा कसलाही विचार न करता त्याचं मनशांत होईपर्यंत माझ्याशी वाद घातले आहेत, असा धक्कादायक आरोप गिरीजा राऊत यांनी केले आहेत.
इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन सेक्स करू शकतो- (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News)
शारीरिक संबंधांवर माझ्या पतीचे असे मत होते की तो फक्त इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन सेक्स करू शकतो, भारतात सेक्स करायला तो comfortable नाही. शारीरिक जवळीक साधल्यास मला दूर लोटत तो मला सांगायचा की मी नाजूक मुलगा आहे, तुला अक्कल आहे का मला असा कसा हाथ लावतेस तू? मुंबईच्या घरी जवळीक साधल्यास आपण इथे कसं काही करणार आईला सगळं ऐकू जाईल. तळगाव, मालवणच्या घरी जवळीक साधल्यास म्हणायचा, इकडे आपण काही करू शकत नाही, खाली रवी दादाला (मदतनीस)सगळं ऐकू जाईल, असंही गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
पतीने सगळे पर्याय डावलून फक्त आय.व्ही.एफ. करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला- (Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News)
माझी सासू आणि माझे पती हे दोघेही सातत्याने शिविगाळ करून, माझ्या घरच्यांवरून मला वाईट बोलून अपमानित करीत होते. त्यामध्ये माझी मानसिक स्थिती बिघडली होती. वरील सर्व प्रकारांना कंटाळून सन 2022 मध्ये आम्ही आमचे कौटुंबिक मित्र डॉ.अनिकेत मांद्रेकर यांच्या सल्ल्याने मानसोपचार तज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी, आय.पी.एच.,ठाणेयांच्याकडे उपचारासाठी गेलो. त्यावेळी त्यांनी आम्हाला दोघांना अॅटी-डिप्रेसंट गोळ्या दिल्या होत्या. परंतु माझे पती गोळ्या घेत नव्हते. कोणत्याही उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. मला हायपोथायरॉईड आहे हे माहीत असून ही गितेशनी मला जबरदस्ती ह्या गोळ्या घ्यायला लावल्या ज्याने मला खूप त्रास झाला. त्यानंतर आम्ही सेक्सोलॉजिस्ट, डॉ. प्रकाश कोठारी, चर्णी रोड, मुंबई यांना आमच्या उपचारासाठी भेटलो. तेथे ही माझ्या पतीने कोणत्याही उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि स्वतःची मनमानी सुरु ठेवली. 2023 मध्ये डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या सांगण्यावरून आम्ही डॉ.नितीन पैदुंगट, स्त्रीरोग तज्ज्ञ, बॉम्बे हॉस्पिटल, चर्चगेट यांचा सल्ला घ्यायला गेलो. आमची तपासणी करून नितीन सरांनी आम्हाला गर्भधारणेची नैसर्गिक आणि आय.व्ही.एफ.पद्धत अशा दोन्ही प्रकारांवर मार्गदर्शन केले. माझ्या पतीने बाकीचे सगळे पर्याय डावलून फक्त आय.व्ही.एफ.पद्धतीला होमइन्सेमिनेशनची प्रक्रिया स्वतःच घरी करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. मी त्यास विरोध करता मला शिवीगाळ आणि दमदाटी केली होती.त्या सगळ्या विचित्र वागणुकीला वैतागून माझ्या पालकांनी माझ्या सास-याची भेट घेतली व सदर बाबत थेट त्यांच्या कानावर घातली. त्यावर सासऱ्यांचं (विनायक राऊत) म्हणणं होतं की, ह्या दोघांमध्ये आजपर्यंत शारीरिक संबंध आले नाही, कारण त्यांच्यात तशी वातावरण निर्मिती झाली नाही. मी कणकवलीला एका ठिकाणी टेस्ट-ट्यूब बेबीची सगळी चौकशी करून आलो आहे. ह्या दोघांना टेस्ट-ट्यूब बेबी प्रक्रियेने आधी मूल होऊ दे, शारीरिक संबंधांच्या विषयावर हे दोघेनंतर काम करतील. सर्व डॉक्टरी इलाजांमध्ये माझे सासरे डॉक्टरांना भेटून जायचे, डॉक्टरांना मॅनेज करायचे आणि त्यांना पाहिजे त्याचप्रमाणे सल्ला देण्यास भाग पाडायचे. ह्या सगळ्यावरून आमच्या लक्ष्यात आले कि गितेश राऊत आणि परिवाराने सर्व परिस्थितीची पूर्व जाणीव असून मुद्दामून आमचा घात केला आहे.
संबंधित बातमी:
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Comments are closed.