प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? 23 फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बातम्या : राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं आहे. आज निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, राज्यातील 12 जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार असून 12 जिल्हा परिषद (ZP Election) आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आला. येत्या 5 फेब्रुवारीला यासाठी मतदान होणार आहे तर 7 फेब्रुवारीला याचा निकाल लागणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला 23 फेब्रुवारी पर्यंत लांबणीवर पडला आहे.

23 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला 23 फेब्रुवारी पर्यंत लांबणीवर पडल्याचं बोललं जात आहे. कारण, 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे रखडलेल्या निवडणुकांविषयी 23 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर या रखडलेल्या निवडणुकांबाबतचा निर्णय होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्तांनी प्रलंबित निवडणुकांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात होईल असे विधान केले आहे.  त्यामुळं उर्वरीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कधी होणार? हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत होईल अशी राज्य आयोगाची भूमिका आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सविस्तर आदेशात प्रकरण 23 फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आज संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. त्यामुळं 23 फेब्रुवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडणार असे चित्र निर्माण झाले आहे.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. त्यानुसार, रायगड, रत्नागिरीसिंधुदुर्ग, सोलापूरकोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगलीछ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयोगाने निवडणुकीने घोषणा करताच 12 जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

कसा असणार निवडणूक कार्यक्रम?

नामनिर्देशन स्वीकारणे – 16 जानेवारी ते 21 जानेवारी

उमेदवारी अर्जांची छाननी – 22 जानेवारी 2026

अर्ज माघारीची अंतिम मुदत – 27 जानेवारी दुपारी 3 पर्यंत

अंतिम उमेदवार यादी व चिन्हवाटप – 27 जानेवारी दुपारी 3.30 नंतर

मतदान 5 फेब्रुवारी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत

मतमोजणी 7 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता पासून

महत्वाच्या बातम्या:

बिगुल वाजला… झेडपी अन् पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा; 5 फेब्रुवारीला महाराष्ट्रात मतदान, निकाल कधी?

आणखी वाचा

Comments are closed.