राज्यातील 72 क्लास वन अधिकाऱ्यांच्या हनीट्रॅपबाबत करुणा शर्मांचा खळबळजनक दावा, म्हणाल्या, ‘अधिक
पुणे: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून हनी ट्रॅपमुळे अनेक अधिकारी अडकल्याची माहिती समोर आली आहे, हा मुद्दा पावसाळी अधिवेशनामध्ये देखील गाजला. राज्यात ‘हनी ट्रॅप’ रोखण्यात सरकार अपयशी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या या आरोपांवरती खुलासा करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले आहेत. या प्रकरणावरती नाना पटोले (Nana Patole) यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सभागृहात दाखवला. या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेलं असताना राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि नेते हनी ट्रपच्या जाळ्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. यावरून काल सभागृहात देखील मोठा गदारोळ बघायला मिळाला. यावर आता करूणा शर्मा (Karuna Sharma) यांनी देखील इशारा दिला आहे.
कुठे चालला आहे आपला महाराष्ट्र
प्रशासकीय अधिकारी, मोठमोठे अधिकारी, मंत्री अगोदर हनी हनी म्हणून मन भरून हनीमून करत आहेत. मन भरल्यानंतर तेच हनी त्यांना ट्रॅप वाटायला लागतं. कमाल आहे. कुठे चालला आहे आपला महाराष्ट्र आणि माझ्याकडे पुरावे सकट असे मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांचे हनी ट्रॅपचे किस्से माझ्याकडे आहेत, वेळ आल्यानंतर मी सगळं चॅनलवरती देणार आहे, असंही पुढे करूणा शर्मा यांनी आपल्या व्हिडीओमध्येमध्ये म्हटलं आहे. राज्यातील तब्बल 72 क्लास वन अधिकारी आणि काही माजी मंत्र्यांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून त्यांचे ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली होती. राज्य सरकारने हे वृत्त फेटाळून लावले असले तरी याबाबत ठोस भूमिकाही घेतली नव्हती. त्यामुळे महायुती सरकारच्या भूमिकेबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचे केंद्र बनले आहेत. या माध्यमातून राज्यातील गोपनीय दस्तऐवज थेट असामाजिक तत्त्वांच्या हाती पोहोचत आहेत, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी काल (गुरुवारी) विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना केला. यावेळी त्यांनी हनी ट्रॅपचे चित्रीकरण असलेला एक पेन ड्राइव्ह देखील त्यांनी सभागृहात दाखवला. या हनी ट्रॅपमुळे महाराष्ट्राच्या प्रशासनाची विश्वासार्हता डागाळली जात आहे. एवढी गंभीर बाब असूनही सरकार यावर साधे निवेदन द्यायला तयार नाही, हे धक्कादायक असल्याचे पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर सरकारची उदासीनता चिंताजनक आहे. या गंभीर सुरक्षाविषयक प्रकरणावर मौन आणि रेशनमधील भेसळीवर कारवाईचा अभाव या सगळ्यामुळे राज्यात नेमके काय चालले आहे? असा प्रश्न निर्माण होतो. सरकारने हे प्रश्न गांभीर्याने घ्यायला हवेत, असेही पटोले म्हणाले.
महाराष्ट्रातील हनीट्रॅप प्रकरण नेमकं काय?
नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका राजकीय नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान राज्यातील 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकल्याचा गौप्यस्फोट केला होता. नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्याचे सांगितले जाते. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात याबाबत एका महिलेने तक्रार केली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते. त्यानुसार राज्यातील तब्बल 72 वरिष्ठ सरकारी आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या (Honey Trap) जाळ्यात अडकल्याची माहिती आहे. या अधिकारी आणि माजी मंत्र्यांची नावे सरकारकडून गोपनीय ठेवण्यात आली आहेत. हा तपासही गोपनीय पद्धतीने सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाणे गुन्हे शाखेकडे एकूण तीन तक्रारी आल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या तीनही तक्रारींची गोपनीय चौकशी सध्या पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईतील एक व्यक्ती आणि ठाण्यातील एका बड्या व्यक्तीने या तक्रारी केल्याचे समजते. या तिन्ही तक्रारींमध्ये गंभीर स्वरुपांचे आरोप असून उच्चस्तरीय गोपनीय चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा तपास करताना ओळख सार्वजनिक करु नये, असे तक्रारदारांचे मत असल्याने अधिकाऱ्यांची नावे गोपनीय ठेवून अशा प्रकरणाचा तपास केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे गुन्हे शाखेकडे तीन तक्रारी प्राप्त झाल्या असल्या तरी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
जे प्रशासकीय अधिकारी हे हनीट्रॅपमध्ये अडकले जातात त्यांच्या तक्रारी आमच्याकडे येतात. या प्रकरणाचा तपास करताना आमची ओळख ही सार्वजनिक करू नका असे तक्रारदारांनी सांगितले आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची नावं गोपनीय ठेवून अशा प्रकरणांचा तपास केला जातो, असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले.
आणखी वाचा
Comments are closed.