पनवेलमधील डान्स बारची तोडफोड करणाऱ्या मनसैनिकांना कोर्टाकडून जामीन; 8 जणांची तुरुंगातून सुटका

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेकापच्या मेळाव्यातून भाषण करताना पनवेलमधील डान्सबारचा (dancebar) उल्लेख केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये सर्वाधिक डान्सबार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर, पनवेलमधील एमएनएस (एमएनएस) कार्यकर्त्यांनी येथील नाईड राईड डान्सबारची मध्यरात्री तोडफोड केली होती. या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली होती. मात्र, आता आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका होत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची महायुतीसंदर्भात (Mahayuti) गेल्या काही महिन्यातील बदलली भूमिका देखील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. कारण, डाव्या विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला मनसेप्रमुख राज ठाकरे प्रमुख पाहुणे होते.

राज ठाकरेंच्या शेकापच्या कार्यक्रमातील भाषणात पनवेलमधील डान्स बारचा उल्लेख आल्यानंतर आणि त्यांच्या इशारानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल येथील नाईट रायटर या डान्स बारची तोडफोड केली होती. याप्रकरणी मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील 8 कार्यकर्त्यांना पनवेल तालुका पोलीसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर, आरोपींना पनवेल न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये डान्स बारचे प्रमाण जास्त असल्याने यावर पोलिसांनी कारवाई न केल्यास डान्स बार विरोधी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील मनसेचे पनवेलमधील शहराध्यक्ष योगेश चिले यांच्याकडून देण्यात आला आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून

नाईट राईड डान्स बारची तोडफोड

राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे असलेल्या लेडीज बारचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. याशिवाय येथील तरूण डान्स बारमुळे बरबाद होत असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यानंतर, राज ठाकरे यांनी डान्स बारबाबत केलेल्या टिकेनंतर पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांनी कोनगाव (पनवेल ) मधील नाईट राईड डान्सबारची तोडफोड केली होती.

डान्सबारला बंदी नाही – अॅड. पाटील

महाराष्ट्रात डान्सबारला कधीच बंदी नव्हती. ते म्हणतात की हे डान्सबार अजून सुरूच कसे आणि त्यांनी अभ्यास केला तर कळेल. मॅक्सिमम डान्सबार हे मराठी लोकांचे आहेत, डान्सबार ऑर्केस्ट्रा या संघटनेची मी वकील आहे, मी खात्रीने आणि अभ्यासपूर्ण सांगते. हे जे वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं आहे हे स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केले आहे. कशासाठी हे सगळं राज ठाकरे करत आहेत. त्यांना काय वाटतं, याच्यातून काय मिळणार आहे, काहीतरी चुकीचं करू नका ज्याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, असे अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी आणि अॅड. जयश्री पाटील यांनी म्हटले होते.

हेही वाचा

रोहित पवारांना ‘तो’ व्हिडिओ कुणी पाठवला; मंत्री मेघना बोर्डीकरांनी स्पष्टच सांगितलं, आमदारांना टोलाही लगावला

आणखी वाचा

Comments are closed.