एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांची भेट का घेतली?; चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितली इनसाईड स्टोरी


मराठी Meets Amit Shah: शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे (मराठी) यांनी काल (19 नोव्हेंबर) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीवेळी एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर आपल्या तक्रारींची सविस्तर मांडणी केल्याची माहिती पुढे येत आहे. या चर्चेदरम्यान शिंदेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याबाबतची नाराजी शाहांना सांगितल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीसह अनेक भागांत भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात ‘ऑपरेशन लोटस’ राबवले गेले आणि भाजपने शिंदे गटातील अनेक माजी नगरसेवकांना फोडून आपल्या पक्षात घेतले आहे. यावरून शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर बोलतांना अमित शाह यांनी मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. माझं या सगळ्यावर लक्ष आहे, असं एकनाथ शिंदेंना सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या सर्व नाराजीवरती आणि सर्व गोष्टींवरती भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत भेट कशासाठी होती आणि काय चर्चा झाली याबाबत माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

Chandrashekhar Bawankule: एनडीएची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर

भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, एकनाथ शिंदे यांना परवा भेटलो होतो, ते कुठेही नाराज नव्हते. काल ते अमित शाह यांना भेटले. नगर विकास खातं तसेच केंद्र सरकार सोबतच्या समन्वयाचे विषय यासाठी एनडीएचे नेता म्हणून त्यांनी भेट घेतली. एनडीएची परंपरा आहे की विशिष्ट कालावधीनंतर नेते भेटत असतात. ते नाराज असल्याची बातम्या कपोलकल्पित आहे. महाराष्ट्रात महायुती 51 टक्के मतांनी विजयी झाली पाहिजे, यासाठी त्यांनी भेट घेतली होती, तीच त्यांची भूमिका आहे. दरम्यान समन्वय समितीमध्ये ठरवले आहे की, एकमेकांच्या पक्षातील पक्षप्रवेश करायचे नाही. मात्र जेव्हा काही कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नाही, तेव्हा कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात. माझ्या कामठी मतदारसंघातूनही भाजपचे पदाधिकारी शिंदे यांच्या पक्षात गेले आहे. सध्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षांतर सुरू आहे. त्यामुळे कुठेही महायुतीत गडबड झाली आहे अशी स्थिती नाही असंही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

मराठी: एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश

भाजपने शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना फोडून पक्ष प्रवेश दिल्यानंतर नाराज झालेल्या शिवसेनेने मित्र पक्षातील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती. 22 तारखेला मित्र पक्षातील या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा घ्यावा, अशी विनंती या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आाणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गेल्या दोन दिवसांत झालेल्या चर्चेनंतर हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महायुतीत वितुष्ट येईल, असं कोणतंही काम करू नका, असे शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना बजावले आहे. हे पक्षप्रवेश प्रामुख्याने ठाणे, रत्नागिरीमराठवाडा, नवी मुंबई, रायगड या भागातले होते अशी माहिती समोर येत आहे.

मराठी Meets Amit Shah: अमित शाह यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले होते की, मी तक्रारीचा पाढा वाचणारा नसून मी रडणारा नाही तर लढणारा आहे. राज्यातील छोटे-मोटे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो. मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरु आहेत, तुम्ही पतंग उडवता. महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे. हा राज्यातला विषय होता. हा विषय दिल्लीत नव्हताच, असे प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

आणखी वाचा

Comments are closed.