मोठी बातमी: ठरलं! मुंबईसह 6 महापालिकेच्या निवडणुका उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र लढणार, पाहा
राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती मुंबई: माजी मुख्यमंत्री, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (27 नोव्हेंबर) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मुंबई महानगरपालिकेसह (Mumbai Municipal Corporation Election 2025)विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. (Uddhav Thackeray Raj Thackeray Meet)
राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट राज्यातील सहा महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance) आहेत. मुंबई महापालिकेसह कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईठाणे, नाशिक, पुणे महापालिकेत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती (Shivsena UBT-MNS Alliance) होणार आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार वरूण सरदेसाई यांच्याकडे जागा वाटपाच्या चर्चेची जबाबदारी असणार आहे.
ठाकरे बंधूंची इथली युती पक्की- (Shivsena UBT-MNS Alliance)
- बृहन्मुंबई महानगरपालिका
- ठाणे महानगर पालिका
- कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
- नवी मुंबई महानगर पालिका
- पुणे महानगर पालिका
- नाशिक महानगर पालिका
मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच- (Raj-Uddhav BMC Election 2025)
मराठीबहुल भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी मनसे आग्रही असल्याची सुत्रांची माहिती आहे. शिवसेना ठाकरेंकडे विद्यमान नगरसेवक असलेल्या 20 ते 25 जागांचीही मनसेकडून मागणी करण्यात आली आहे. तसंच ठाकरेंकडून शिंदे गटात गेलेल्या काही नगरसेवकांच्या जागांसाठीही मनसे आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाची ताकद असलेल्याच अनेक जागा मनसे मागत असल्याने ठाकरे गटाची गोची झाली आहे. परंतु मनसेची संबंधित प्रभागातील संघटनात्मक ताकद, तगडा उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर शिवसेना ठाकरे गट ठाम आहे. दादर माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, भांडूप, जोगेश्वरी या मराठीबहुल भागातील प्रभागांसाठी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये रस्सीखेच सुरु आहे. कोण कुठून लढणार? याबाबत ठाकरे बंधूंच्या चर्चेमध्ये काल ठोस तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दोन्ही बंधुंमध्ये चर्चेच्या आणखी काही फेऱ्या अपेक्षित आहेत. निवडून येवू शकणाऱ्या एकेका जागांवर सखोल चर्चा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात होत आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.