उद्या निवडणुका अन् आज पुढे ढकलल्या हे चूक; देवेंद्र फडणवीसांचे निवडणूक आयोगावर आक्षेप, काय काय


Devendra Fadnavis On Nagarparishad Election Postponed: राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका (Nagarparishad Election 2025) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहे. गेल्या दोन आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता. तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलंय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथं आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकीच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आक्षेप घेतले आहेत.

निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहित नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे.  उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

22 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांना स्थगिती- (Nagarparishad Election Postponed)

अमरावती विभाग-
बाळापूर
अंजनगाव सुर्जी
यवतमाळ
देऊळगाव राजा
वाशिम

कोकण विभाग-
अंबरनाथ

C. संभाजीनगर विभाग-
फुलंब्री
धर्माबाद
मुखेड
रेणापूर
वसमत

नागपूर विभाग-
घुघूस
देवळी

नाशिक विभाग-
देवळाली-प्रवरा
कोपरगाव
पाथर्डी
नेवासा

पुणे विभाग-
बारामती
फुरसुंगी-उरळी देवाची
महाबळेश्वर
फलटण
मंगळवेढा
अंगार

नगरपालिका,नगरपंचायत निवडणुकीचा सावळागोंधळ (Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 )

नगराध्यक्षपद-

घोषणा
288

बिनविरोध
3

स्थगित केले
22

उद्या मतदान
२५३

निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस- (Nagarpalika Nagarpanchayat Election 2025)

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला नगरपलिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वच बड्या नेत्यांच्या आज सभा पार पडणार आहेत. मुख्यमंत्र्यांची संभाजीनगर, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, बीडमध्ये सभा होणार आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाशिकच्या त्रंबकेश्वर, संभाजीनगरमध्ये तर अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यसह नाशिकच्या भगूरमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस कसा गाजतो ते पाहावं लागेल.

संबंधित बातमी:

Nagarpalika Nagarpanchayat Election 2025 Postponed: राज्यातील 22 नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; आता मतदान अन् मतमोजणी कधी होणार?, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.