कुणाची बाजी अन् कोण गुलाल उधळणार? EVM मशिन उघडणार, 288 नगरपालिकांचा फैसला आज
मुंबई : राज्यातील एकूण 288 नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निकाल आज लागणार आहे. पहिल्यांदाच महायुतीतील तीनही पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढल्याचं दिसून आलं. तर महाविकास आघाडीमध्येही तसंच चित्र पाहायला मिळालं.राज्यातील लहान शहरांचा कौल कोणाला? याचा फैसला या निमित्ताने होणार आहे. त्यामुळेच या निकालाची उत्सुकता सर्वांनाच लागल्याचं दिसतंय.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. त्यामुळेही नगर पालिका निवडणुकीच्या निकालांकडे महापालिकांची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात आहे. तसेच राज्यातील क्रमांक एकचा पक्ष नेमका कोणता याचाही फैसला होणार आहे.
राज्यातील 288 नगरपालिकांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडलं. पहिल्यांदा 2 डिसेंबर रोजी 265 नगरपालिका, नगर परिषदांसाठी मतदान पार पडलं. तर 20 डिसेंबर रोजी उर्वरित 23 ठिकाणी मतदान पार पडलं. या सर्वांच्या मतपेठ्या म्हणजे ईव्हीएम मशिन आज खुले होणार आहेत.
Maharashtra Nagarpalika Election Result : विभागनिहाय संख्या –
कोकण विभाग- 27
नाशिक विभाग – 49
पुणे विभाग – 60
छत्रपती संभाजीनगर – 52
अमरावती विभाग – 45
नागपूर विभाग – 55
राज्यातील काही ठिकाणी निवडणुका या चुरशीने पार पडल्या. त्या गाजल्या कारण महायुतीतील तीनही पक्ष, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी हे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळालं. त्यातल्या त्यात खरी चुरस ही भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दिसून आलं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
महाराष्ट्र उच्च व्होल्टेज निवडणूक परिणाम: हाय व्होल्टेज लढती
कणकवली निवडणूक : कणकवली नगरपालिका
- आमदार निलेश राणे-रवींद्र चव्हाण यांच्यात वाद.
- भाजप नेत्याच्या घरी पैशांची बंडलं सापडल्याचा निलेश राणेंचा व्हिडीओ.
- भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे निलेश राणे या दोन भावांमध्ये काही प्रमाणात 'तू तू मी मी' झाल्याचं समोर.
- निलेश राणे खणखणीत नाणे, एकनाथ शिंदेंनी ताकद दिली.
सांगोला निवडणूक: सांगोला
- भाजपकडून आपल्याला त्रास झाल्याचा शिंदेंचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा आरोप
- भाजपसाठी काही केलं, तरीही माझ्याशी असं का वागले? अशी शहाजी बापूंची खंत.
- शहाजी बापूंच्या कार्यालयावर पोलिसांची छापेमारी.
कागल निवडणूक: कागल
- अजितदादांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजीत घाटगे हे दोन कट्टर विरोधक एकत्र.
- दोन राष्ट्रवादींची शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय मंडलिकांविरोधात एकी.
- या दोघांच्या एकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी पडद्यामागून फिल्डिंग लावल्याची चर्चा.
डांगमनेर निवडणूक: संगमनेर
- काँग्रेस पक्षाच्या पंजाशिवाय पहिल्यांदाच नगरपालिकेची निवडणूक
- राधाकृष्ण विखे पाटलांकडून बाळासाहेब थोरातांना टोला.
चंदगड कोल्हापूर निवडणूक: चंदगड
- दोन्ही राष्ट्रवादी राज्यात पहिल्यांदा एकत्र.
- मुश्रीफांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती केल्याने चर्चा.
हिंगोली निवडणूक: हिंगोली
- भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि शिंदेंचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यात जुंपली.
- बांगरांच्या घरी पहाटे पाच वाजता 100 पोलिसांनी झाडाझडती घेतली.
- यामागे भाजप आमदार तानाजी मुटकुळे असल्याचा बांगरांचा आरोप.
- रोहा, कर्जत, पनवेल या ठिकाणी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने
अंबरनाथ निवडणूक: अंबरनाथ
- अंबरनाथमध्ये नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या सेनेत वाद
- शिंदेंच्या उमेदवाराने बोगस मतदान आणल्याचा भाजपचा आरोप
पालघर निवडणूक: पालघर
- पालघरमधील जव्हार, पालघर, डहाणू या नगर परिषदांमध्येही जोरदार लढत
- पालघरमधील जव्हार, पालघर, डहाणू या नगर परिषदांमध्येही जोरदार लढत
आणखी वाचा
Comments are closed.