शंभूराज देसाईंच्या घरी महत्वाची बैठक, रामराजे नाईक निंबाळकरांची उपस्थिती

सातारा: आज राज्यभरात 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकांचा निकाल उद्या म्हणजे 16 जानेवारीला लागणार आहे. यानंतर लगेच उद्यापासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून रणनीती आखली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज साताऱ्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडल्याची माहिती मिळात आहे.

आज पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक

मिळालेल्या माहितीनुसार, आज पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस माजी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार नितीन काका पाटील उपस्थित होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना विचारले असता, त्यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नवीन घरी चहा घेण्यासाठी आलो होतो असे सांगितले. पुढील राजकीय भूमिका काय?  असं विचारलं असता त्यांनी नो भूमिका असे म्हटले आहे. चहा चांगला होता असे असे मिश्कील उत्तर यावेळी मात्र, नाईक निंबाळकरांनी दिले आहे.

राज्यातील 12 जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार

नगरपालिका, महापालिका निवडणुकानंतर राज्याचं लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. त्यानुसार, राज्यातील 12 जिल्ह्यात निवडणुकांचा धुरळा उडणार असून 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आला. त्यानुसार, राज्यात 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून रोजी 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. त्यानुसार, रायगड, रत्नागिरीसिंधुदुर्ग, सोलापूरकोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयोगाने निवडणुकीने घोषणा करताच 12 जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बिगुल वाजला… झेडपी अन् पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा; 5 फेब्रुवारीला महाराष्ट्रात मतदान, निकाल कधी?

आणखी वाचा

Comments are closed.