माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला… आता माझा भाऊ पळवला! शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंची उद्धव ठाक
Raj Thackeray Meet मराठी मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल (बुधवारी, ता १८) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांची भेट घेतली आहे. ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) या भेटीनंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. म्हात्रेंनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट करत म्हटलंय की, माझा पक्ष पळवला…माझा बाप पळवला… आता माझा भाऊ पळवला !!! असं लिहून त्यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे.
माझा पक्ष पळवला… माझा बाप पळवला… आता माझा भाऊ पळवला !!! pic.twitter.com/9doEQ8Xw4B
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) 18 फेब्रुवारी 2026
…..तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल!!- नरेश म्हस्के
त्याचबरोबर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट करत म्हटलंय की, काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार @एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @राज ठाकरे साहेब यांची भेट झाली.. अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला… परंतु, बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल!!
काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार @एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष @राज ठाकरे साहेब यांची भेट झाली.. अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला… परंतु, बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी,… pic.twitter.com/hYnGgupyy2
— नरेश म्हस्के (@nareshmhaske) 19 फेब्रुवारी 2026
राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीचा तपशील समोर
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहिल, असे आश्वासन दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, या भेटीत केडीएमसी निवडणुकांसह इतरही राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील 4 वर्षांत राज ठाकरे- एकनाथ शिंदे यांच्यात अनेक वेळा अधिकृत आणि अनौपचारिक भेटी
सप्टेंबर 2022: मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपती दर्शन घेतले.
नोव्हेंबर 2022: ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते.
डिसेंबर 2022: नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरात दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
मार्च 2023: गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली.
जुलै 2023: राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी जाऊन विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली.
ऑगस्ट 2024: मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास आणि पोलिसांच्या घरांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली.
सप्टेंबर 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा एकदा ‘वर्षा’ निवासस्थानी गेले होते.
एप्रिल 2025: 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि एकत्र जेवण केले.
फेब्रुवारी 2026: नुकत्याच (18 फेब्रुवारी 2026) झालेल्या माहितीनुसार, विविध शासकीय आणि राजकीय विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांच्यात पुन्हा भेट झाली आहे.
थोडक्यात सांगायचे तर: सत्तांतरानंतरच्या पहिल्या काही महिन्यांतच त्यांच्यात 5-6 भेटी झाल्या होत्या. त्यानंतर 2023 ते 2026 या काळात सण-उत्सव, चित्रपट मुहूर्त आणि राजकीय खलबतांच्या निमित्ताने त्यांच्यात अंदाजे 10 ते 15 पेक्षा जास्त वेळा भेटी झाल्याचे दिसून येते.
आणखी वाचा
Comments are closed.