नमो शेतकरी महासन्मानचे 2000 रुपये 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग: देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषण करताना विविध मुद्यांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नमो शेतकरीचा हप्ता वर्ग

देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारचे 6000 रुपये आणि राज्य सरकारचे 6000 रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1800 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात दोन योजनांमधून 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 54 लाख कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

कांद्याच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार साखर उद्योगाला मदत करणार असल्याचं जाहीर केलं. साखर उद्योगाला मदत करण्यासाठी समिती स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं. कांद्यासंदर्भात अडचण निर्माण झाली आहे.देशाच्या तुलनेत 50 टक्के कांदा उत्पादन महाराष्ट्रात होतं. महाराष्ट्रातील 60 टक्के उत्पादन नाशिक जिल्ह्यात होतं. नाशिक, नगर, पुणे आणि सोलापूर हे कांदा उत्पादक जिल्हे आहेत. त्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कांद्याचं उत्पादन आणि कांदा वापराची क्षमता यात फरक आहे. आपल्या उत्पादनाच्या  50 टक्के कांदा देशात वापरला जाऊ शकतो. कांद्याची निर्यात 10 टक्क्यांपेक्षा जास्त होत नाही. कांद्याचा प्रश्न दीर्घकालीन दृष्टिकोण ठेवून सोडवला पाहिजे. कांद्या संदर्भात आज सकाळी बैठक झाली, शेतकऱ्यांना काय मदत करता येईल याचा आराखडा तयार करावा, असं त्यांना सांगितलं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. कांदा प्रश्नी केंद्र सरकारकडे काय करता येईल यासाठी चर्चा केली, असं फडणवीस म्हणाले. कांद्याच्या निर्यातीसाठी मॉरिशस सोबत चर्चा सुरु असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देऊन कांद्याचं क्षेत्र कमी करुन पर्याय काढता येईल यावर काम केलं जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे, फडणवीस यांनी म्हटलं.

कोकणातील आंबा आणि काजू पिकाला कमी फळधारणा झाली आहे. कोकणातील दोन्ही सभागृहातील लोकप्रतिनिधींसोबत चर्चा झाली.

आणखी वाचा

Comments are closed.