आढावा बैठकीदरम्यान श्रीकांत शिंदेंसमोरच शाब्दिक चकमक, दौरा संपताच अख्खी कार्यकारिणीच बरखास्त
सोलापूर शिवसेना : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेच्या (Shrikant Shinde) सोलापूर दौऱ्यानंतर माढा आणि सोलापूरमधील जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुखांची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांमधील कुरघुडी मोठ्याप्रमाणात चव्हाट्यावर आली होती. अनेकांनी जिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह कामावर (Solapur Shivsena) आक्षेप घेतले होते. यावेळी श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली होती. परिणामी आता पक्षाकडून मोठं पाऊल उचललं गेल्याचे चित्र आहे.
दरम्यानआगामी काळात तालुका आणि जिल्हा पातळीवर निवडी या मुख्य पक्ष कार्यालयातूनच होईल, अशा सूचना श्रीकांत शिंदेंनी दिल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाचे मुख्यसचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मंगळवारी रात्री उशिरा माढा आणि सोलापूरमधील शिवसेनेची जिल्हाधिकारी ते शाखाप्रमुख कार्यकारिणी बरखास्त केल्याचे पत्र जाहिर केले आहे.
Solapur Shivsena : पक्षांतर्गत वाद बाजूला ठेवून मोहिमेत काम करण्याच्या सूचना
दरम्यानपुढील सर्व पदे ही संपर्कप्रमुख व लोकसभा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन संपर्कप्रमुखांचा अहवाल आल्यानंतर भरण्यात येणार आहेत. मात्र तो पर्यंत पक्षांतर्गत वाद बाजूला ठेवून सर्व पदाधिकारी यांनी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेत काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Solapur Politics: नाराजीनाट्यावर मित्रपक्षाची नजर, पदाधिकारी गळाला लागतात का याचीही चाचपणी
तसेच चांगली कामगिरी करणाऱ्या शिवसैनिकांच्या नोंद घेऊन, त्यांच्या कामगिरीनुसार पक्षाकडून त्यांना पुढील पदे देणार असल्याचे श्रीकांत शिंदेंनी पत्रातून स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या या नाराजीनाट्यावर मित्रपक्ष नजर ठेवून असून नाराज पदाधिकारी गळाला लागतात का? याचीही चाचपणी मित्रपक्षाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Shivsena : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदे सेनेच्या युवा सेनेचा ‘युवामहोत्सव’
दुसरीकडेशिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात शिंदे सेनेच्या युवा सेनेचा ‘युवामहोत्सव’ शनिवारी होणार आहे. या कार्यक्रमाला पक्षाचे सर्वेक्षणते सर्व एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. या मोहत्सवाला राज्यभरातून सर्व युवासेनेचे पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. वरळीच्या डोम येथे हा ‘युवा सेनेचा भव्य मेळावा’ सकाळी 10 ते सायंकाळी 5 दरम्यान होणार आहे. या मेळाव्यात पक्षाची पुढील वाटचाल, संघटना बांधणी, युवासेनेच्या पदाधिकार्यांवरील जबाबदारी, या शिवाय रोजगार, शिक्षण, पर्यावरण, आणि सामाजिक प्रश्नांवर काम करणे यावर शिवसेना नेते आणि मंत्री यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.