पक्षविरोधी नेत्यांची भेट? नवसंजीवनी देण्याऐवजी नव्या वादाच कारण ठरलंय ‘काँग्रेस संघटन सृजन अभिय

नागपूर काँग्रेस बातम्या : राज्यात सध्या काँग्रेसच्या संघटनेच्या पुनर्गठनासाठी ‘काँग्रेस संघटन सृजन अभियान’ (Congress Sanghtan Srijan Abhiyan) सुरू आहे. मात्र नागपुरात काँग्रेसचा (Nagpur Congress) हेच ‘संघटन सृजन अभियान’ पक्षातील अंतर्गत वादाचे कारण ठरघ्या आहे. संघटनेच्या पुनर्रचनेसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून केंद्रीय निरीक्षक म्हणून अरुण यादव (Arun Yadav), तर महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीकडून पर्यवेक्षक म्हणून जिया पटेल आणि इतराना पाठविण्यात आले आहे. मात्र, पर्यवेक्षक म्हणून आलेल्या जिया पटेल यांची काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांसोबतची एका हॉटेलमधील भेट वादाचा कारण बनली आहे.

नागपूर काँग्रेस : पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांची भेट घेतल्याचा आणि चिकन पार्टी केल्याचा आरोप

काँग्रेसच्या एका गटाने पर्यवेक्षक जिया पटेल यांच्या भूमिकेबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. जिया पटेल यांनी एका हॉटेलमध्ये जाऊन पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्या आणि लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकांमध्ये पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात जाऊन पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या काही स्थानिक नेत्यांची भेट घेतल्याचा आणि चिकन पार्टी केल्याचा आरोप काँग्रेस नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य अभिजीत झा यांनी केला आहे. तर पक्षविरोधी कारवाया करण्याचा आरोप लागलेल्या ज्या स्थानीय नेत्यांशी जिया पटेल एका हॉटेलमध्ये जाऊन भेटले त्यांनी जिया पटेल यांच्या भूमिकेचा समर्थन केला आहे. आमच्या मागणीनंतरच जिया पटेल हॉटेलमध्ये आम्हाला भेटले असून पक्षनेतृत्वाने पर्यवेक्षकांना पक्षातील सर्वांची भूमिका जाणून घेण्यासाठीच पाठवले असताना जिया पटेल काहींशी वेगळे भेटले, तर त्यात गैर काय? असा सवाल कमलेश चौधरी यांनी विचारला आहे.

Nagpur Congress: पक्षातील अंतर्गत वाद उघडकीस, भेटीचा हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समो

पक्षाला बळकट करण्यासाठी आणि शहर अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी काँग्रेस संघटना उभारणी मोहीम राबवत आहे. या मोहिमेसाठी अरुण यादव यांची निरीक्षक म्हणून, तर जिया पटेल आणि अशोक बोबडे यांची सह-निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे निरीक्षक विविध विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून संघटना मजबूत करण्यासाठी एक अहवाल तयार करतील. या घटनेमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद निरीक्षकांसमोर उघडकीस आला आहे. याचा परिणाम आगामी शहर अध्यक्ष नियुक्तीवर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिया पटेल यांना विरोध करणाऱ्या गटाने आता जिया पटेल आणि काही निवडक काँग्रेस नेत्यांच्या भेटीचा हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज समोर आणला आहे. त्यामुळे संघटनेच्या पुनर्रचनेसाठी सुरू करण्यात आलेला काँग्रेसचा संघटन सृजन अभियान संघटनेला नवंसंजीवनी देण्याऐवजी वेगळ्याच वादात अडकला आहे..

आणखी वाचा

Comments are closed.