धर्मांतर प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खानचं मुंब्रा कनेक्शन! फरार असताना मुंबईत डॉक्टरांची भेट;

मुंबई: नाशिक येथील (Nashik Crime News) नामांकित आयटी कंपनीतील कर्मचारी धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, फरार निदा खान हिने १३ एप्रिल २०२६ रोजी मुंबईतील एका डॉक्टरकडून मेडिकल सर्टिफिकेट घेतल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अटकपूर्व जामिनासाठी धडपडणाऱ्या निदाला (Nida Khan) पकडण्यासाठी पुणे-मुंबईसह मोठमोठ्या शहरांमध्ये शोध मोहीम राबवली असताना, तिने थेट मुंबईत वैद्यकीय कागदपत्रे सादर केल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. पोलीस दप्तरी फरार असणाऱ्या निदा खानने मुंबईतील डॉक्टरकडून मेडिकल सर्टिफिकेट घेतले असल्याचे समोर आले आहे, त्याचबरोबर सर्टिफिकेटमध्ये डॉक्टरांनी तिला गर्भवती असल्याने 1 आठवडा आराम करण्याचा सल्ला दिल्याचे या सर्टिफिकेटमधून समोर आले आहे.(Nida Khan)

संशयित निदा खान फरार, 20 ते 22 दिवसांपासून फरार आहे. 13 एप्रिलला मुंब्रा परिसरातील डॉक्टरकडून तिने हे सर्टिफिकेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. ती फरार असताना मुंबईत ती होती का? पोलिस तपासात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सर्टिफिकेटमध्ये गर्भवती असल्याने 1 आठवडा आराम करण्याचा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला आहे. अटकपूर्व जामिनासाठी मेडिकल सर्टिफिकेट घेतल्याचा संशय आहे.

डॉ शमायला आझमी, यांच्याकडे निदा खान हिने प्रेग्नेंट असताना ट्रिटमेंट घेतली होती, २ वेळा निदा यांच्याकडे आली होती, त्यावरून त्यांनी एक लेटर निदा खानला दिले होते. निदा हिच्या पोटात दुखत होते, त्यामुळे त्यांनी ऑफीसमधून सुट्टीसाठी लेटर घेतले होते, १३ एप्रिल रोजी शेवटची निदा आली होती. सर्टिफिकेटमध्ये डॉक्टरांनी तिला गर्भवती असल्याने 1 आठवडा आराम करण्याचा सल्ला दिल्याचे या सर्टिफिकेटमधून समोर आले आहे.

निदा खानने मुंबईला बदली करून घेतली होती. त्यानंतर ती मोईन खानसोबत मुंब्रा येथे राहत होती. ती टीसीएस कंपनीच्या मालाड येथील कार्यालयात जात होती. आता तिला कामावरून काढल्याची नोटीस कंपनीने दिली. त्यानंतर तिची मावशी नुरी शेख तिला दोन दिवसांपूर्वी नाशिक येथे घेऊन गेल्याचे चौकशीत पती मोईन याने सांगितले.

Nida Khan :  धर्मांतर प्रकरणात 8 जणांवर गुन्हा, 7 आरोपी अटकेत, निदा खान फरार

धर्मांतर प्रकरणात 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यातील 7 आरोपी अटकेत आहेत, तर निदा खान फरार आहे. कंपनीतील महिलांवर अत्याचार आणि धर्मांतराचा आरोप या आरोपींवरती आहे.  पोलिसांच्या तीन पथकांचा शोध सुरू आहे, मात्र अद्याप ठोस सुगावा नाही. निदा खानच्या पतीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Nida Khan :  राष्ट्रीय महिला आयोगाच पथक नाशिकमध्ये दाखल…

राष्ट्रीय महिला आयोगाच पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. तर महिलांवर अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचे पथक नाशिक शहरात बैठक घेऊन प्रकरणाची माहिती घेणार आहे. कंपनीला महिला आयोगाचे सदस्य भेट देणार आहेत. चार सदस्यीय असणार हे पथक आज प्रत्यक्ष घटनास्थळाची देखील पाहणी करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव, माजी पोलीस महासंचालक बी के सिन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या मोनिका अरोरा आणि आयोगाच्या वरिष्ठ समन्वयक यांचा समितीत समावेश असल्याची माहिती आहे. घटनास्थळाची पाहणी करत पीडित महिला कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधी समिती चर्चा करणार आहे. समितीची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील काही दिवसात हा सगळा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना सादर केला जाणार आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.