न्यूझीलंडच्या माजी खेळाडूवर संपूर्ण क्रिकेटमधून दोन वर्षांची बंदी, कारण काय? वाचा…
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेल याच्यावर दोन वर्षांची मोठी बंदी घालण्यात आली असून तो 2027 पर्यंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहणार आहे. ब्रेसवेलने 2023 च्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती, मात्र तो सक्रियपणे काउंटी क्रिकेट (County cricket) खेळत असल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.
या बंदीचे मुख्य कारण म्हणजे 2025 मध्ये एसेक्स आणि समरसेट यांच्यातील सामन्यादरम्यान झालेली त्याची उत्तेजक चाचणी (Dope Test) होय. लंडनमधील ‘WADA’ मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ब्रेसवेलच्या नमुन्यांमध्ये कोकेन आणि ‘बेंझॉयलेकगोनाइन’ हे प्रतिबंधित घटक आढळले. ब्रेसवेलने स्वतः 24 सप्टेंबरच्या रात्री कोकेन घेतल्याची कबुली दिली आहे. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या नियमांनुसार या पदार्थांचे सेवन करणे प्रतिबंधित असून, ब्रेसवेलकडे या पदार्थाच्या वापरासाठी कोणतीही वैद्यकीय सवलत नसल्याने त्याच्यावर ही कारवाई निश्चित करण्यात आली.
पाकिस्तानी वंशाचा खेळाडू पहिल्यांदाच IPL खेळणार! दिल्ली कॅपिटल्सकडून मैदानात उतरणार
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) नियमांनुसार ही बंदी 24 नोव्हेंबर 2025 पासून 23 नोव्हेंबर 2027 पर्यंत लागू असेल. या काळात ब्रेसवेलला कोणत्याही स्पर्धात्मक सामन्यात खेळणे किंवा सरावासाठी बोर्डाच्या सुविधा वापरणे यावर पूर्णपणे निर्बंध असतील. 67 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेला आणि आयपीएलमध्येही खेळलेला हा खेळाडू यापूर्वी 2024 मध्येही न्यूझीलंडमधील देशांतर्गत स्पर्धेदरम्यान अशाच प्रकारच्या प्रकरणात दोषी आढळला होता. ‘वाडा’च्या नियमांनुसार, निवृत्त खेळाडूही जर स्पर्धात्मक क्रिकेट खेळत असतील, तर ते उत्तेजक चाचणीच्या कक्षेत येतात. आपल्या कारकिर्दीत 69 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 120 बळी घेणारा हा खेळाडू आता कोणत्याही अधिकृत क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
Comments are closed.