27 वर्षांनंतर सूड! काकाच्या एन्काऊंटरचा बदला घेत पुतण्याने केला पोलीस खबऱ्याचा ‘गेम’

मुंबई क्राईम न्यूज : मुंबईच्या अंडरवर्ल्ड इतिहासाची आठवण करून देणारी धक्कादायक घटना नागपाडा परिसरात समोर आली आहे. 27 वर्षांपूर्वी झालेल्या एन्काऊंटरची माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून एका ज्येष्ठ व्यक्तीची त्यांच्या पुतण्याने हत्या केल्याचे उघड झाले आहे.

मुंबईत 80-90 च्या दशकात अंडरवर्ल्ड आणि गँगवॉर मोठ्या प्रमाणावर होत होते. पोलिसांनी एन्काऊंटरच्या माध्यमातून अनेक कुख्यात गुन्हेगारांचा खात्मा केला. मात्र त्या काळातील एका घटनेचा सूड इतक्या वर्षांनी उगवला जाईल, याची कोणालाही कल्पना नव्हती.

Nagpada Incident : घरात घुसून निर्घृण हत्या

20 एप्रिल रोजी नागपाडा परिसरात 78 वर्षीय मोहम्मद इक्बाल सेलिया यांची त्यांच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. सादिक जावर आणि त्याचा साथीदार नौशाद मिठानी यांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या करून दोघेही पसार झाले होते.

Crime Mystery : सुरुवातीला कारण अस्पष्ट

या हत्येमागील कारण सुरुवातीला समजत नव्हते. कारण आरोपी आणि मृत व्यक्ती यांच्यात कोणताही वैर किंवा आर्थिक वाद नव्हता. दोन्ही कुटुंबांमध्ये सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे पोलिसांसमोर मोठं कोडं निर्माण झालं होतं.

Encounter Revenge : 1999 च्या एन्काऊंटरचा सूड

1999 मध्ये गँगस्टर सादिक कालिया आणि आरिफ कालिया यांचा एन्काऊंटर पोलिसांनी केला होता. या एन्काऊंटरसाठी माहिती इक्बाल सेलिया यांनी दिल्याचा समज होता. त्याचाच बदला घेण्यासाठी सादिक जावरने ही हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Crime Planning : युट्यूब व्हिडीओ पाहून निर्णय

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, आरोपी सादिकला अलिकडे युट्यूबवरील एका व्हिडीओमधून आपल्या काकांच्या एन्काऊंटरबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्याने सूड घेण्याचा निर्णय घेतला आणि साथीदारासह कट रचला.

Arrest Update : नागपूरहून अटक

पोलिसांनी तपास करत सादिक जावर आणि नौशाद मिठानी यांना नागपूर येथून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी कोणते कारण होते का, याचा शोध घेतला जात आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.