मनोहर मामा भोसले हा सोलापूरचा अशोक खरातच, डीएडमध्ये नापास होऊन भोंदू  झाला : अस्मिता बालगावकर

सोलापूर मनोहर मामा भोसले बातम्या : स्वतःला ‘बाळूमामाचा अवतार’ सांगून भोंदूगिरी करणारा मनोहर मामा भोसले याला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. करमाळ्यातील 27 एकरांचा आलिशान आश्रम, व्यवसाय वाढवण्याचे आमिष दाखवून 50 हजारांची फसवणूक आणि एका व्यावसायिकाला भोंदूगिरीच्या प्रकरणात अडकवल्याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची आहे. या प्रकरणावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोहर मामा भोसले हा सोलापूरचा अशोक खरातचं म्हणता येईल. हा मनोहर भोसले डीएड मध्ये नापास झाला आणि भोंदू बाबा झाल्याचे बालगावकर म्हणाल्या.

शिक्षक होऊन ज्ञानाची जोत पेटवण्याऐवजी याने लोकांना फसवण्याचा धंदा निवडल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्ष डॉ. अस्मिता बालगावकर म्हणाल्या. लोकांनी अशा बाबापासून सावध राहायला हवं कारण आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आणखी असे बरेच भोंदू बाबा आहेत. आम्ही लोकांचं प्रबोधन करण्याचे काम करत आहोत. आमची जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन असे कोणत्याही बाबाकडे जाऊ नका. विशेषतः महिलांना आवाहन आहे की तुमच्या कुठल्या ही समस्या असतील त्या बाबाकडे सुटणार नाहीत. तुमच्या वैज्ञानिक मार्गानेच समस्या सुटू शकतील. तुमची फसवणूक झाली असेल तर पोलिसांकडे तक्रार द्यावी ही आमची विनंती असेल असे त्या म्हणाल्या.

Manohar Mama Bhosale :  घोटी या गावात जवळपास 27 एकर जागा खरेदी

मनोहर मामा यांचे मुख्य वास्तव्य हे पुण्यात असायचे. तिथूनच उंदरगाव सोडल्यानंतर त्यांनी करमाळ्यातील घोटी या गावात जवळपास 27 एकर जागा खरेदी केली. गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी आता एक आलिशान आश्रम उभा राहिला असून परिसरात आंबा आणि इतर फळबागांची मोठी लागवड केली आहे. मात्र घोटी येथे आश्रमाची उभारणी करताना जाण्याचा रस्ता असेल किंवा इतर बाबीत घोटी ग्रामस्थांनी मनोहर मामा यांच्यात खटके उडत राहिले. यातूनही मनोहर मामाने आपल्या राजकीय कॉन्टॅक्टचा वापर करून घोटी ग्रामस्थांवर दडपण आणायचा प्रयत्न केला होता. मात्र गावचे सरपंच विलास काका राऊत हे ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि मनोहर भोसलेचे सर्व डाव हाणून पाडले. आता मनोहर भोसलेला पुन्हा एकदा फसवणूक जादूटोणा गुन्ह्यात अटक करून पोलीस कोठडीत पाठविल्यानंतर घोटी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आता घोटी येथील मनोहर मामाचा हा आश्रम  बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी आश्रमाची सखोल चौकशी करून तातडीने बंद करण्याची मागणी सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

Manohar Mama Bhosale : बाभळीचा पाला साखर भंडारा विकत घ्यायला….

मात्र दरम्यानच्या कालावधीत 9 सप्टेंबर 2021 मध्ये करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर भोसले यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिसांनी त्यांच्या मुस्क्या आवडत गुन्हा दाखल केल्यावर न्यायालयाने 19 सप्टेंबर 2021 रोजी त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. याच कालावधीत कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला साखर भंडारा विकत घ्यायला लावणाऱ्या मनोहर मामा याच्यावर बारामती पोलीस ठाण्यातही अडीच लाखाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यामुळेच माध्यमानी उंदरगाव येथील ग्रामस्थांच्या बाजूने मामा विरुद्ध आवाज उठवला आणि उंदरगाव येथील आलिशान आश्रम 2021 मध्ये बंद करावा लागला. सध्या उंदरगाव येथील आश्रमात मनोहर भोसले यांचे आई वडील राहत असल्याचे सांगितले जाते. मात्र यानंतर मनोहर भोसले यांनी कधीही उंदरगावात आपला दरबार भरवला नाही.

आणखी वाचा

Comments are closed.