लखनौ आणि कोलकाताचा सुपर ओव्हरमधील थरार; रिंकू सिंहने एका चेंडूत सामना संपवला, VIDEO

KKR वि LSG सुपर ओव्हर IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल (26 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स (KKR vs LSG) यांच्यात सामना खेळवण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. सुपर ओव्हरमध्ये कोलकाताच्या सुनील नारायणने लखनौचे दोन्ही फलंदाज केवळ एका धावेत बाद केल्यानंतर रिंकू सिंहने पहिल्याच चेंडूवर चौकार मारत कोलकाताला विजयी केले. यासह कोलकाताने तळाचे स्थान सोडताना आठव्या स्थानी झेप घेतली. (KKR vs LSG Super Over IPL 2026)

सुपर ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? (KKR vs LSG Super Over Match)

    • लखनौकडून निकोलस पूरन आणि एडन मार्कराम फलंदाजीसाठी आले. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने गोलंदाजी सुनील नरेनकडे सोपवली.
    • पहिल्याच चेंडूवर पूरन त्रिफळाचीत झाला. त्यानंतर ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला.
    • पंतने एक धाव काढली. त्यानंतर मार्करामने स्ट्राईक घेतली.
    • तिसऱ्या चेंडूवर मार्करामने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि रिंकू सिंगने त्याचा झेल घेतला.
    • सुपर ओव्हरमध्ये लखनऊच्या फलंदाजांना फक्त 1 धाव काढता आली, त्यामुळे केकेआरसमोर दोन धावांचे लक्ष्य राहिले.
    • त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये कोलकाताचे फलंदाज फलंदाजीसाठी आले. कर्णधार ऋषभ पंतने चेंडू प्रिन्स यादवकडे सोपवला.
    • रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर एक शानदार चौकार मारून केकेआरचा विजय निश्चित केला.

आयपीएल 2026 मधील पहिला सुपर ओव्हर सामना- (KKR vs LSG Super Over IPL 2026)

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रिंकू सिंगच्या धमाकेदार अर्धशतकाच्या जोरावर केकेआरने 20 षटकांत 7 गडी गमावून 155 धावा केल्या. एलएसकेनेही 20 षटकांत 8 गडी गमावून 155 धावा केल्या. डावाच्या शेवटच्या चेंडूवर शमीने कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर षटकार मारून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. यामुळे हा आयपीएल 2026 मधील पहिला सुपर ओव्हर सामना ठरला.

संबंधित बातमी:

अंगकृष्ण रघुवंशी विकेट वाद : angkrish रघुवंशीच्या वादग्रस्त विकेटवरून राडा; बॅट-हेल्मेट दिले फेकून, तिसऱ्या पंचांच्या निर्णयानंतर गदारोळ, नेमकं काय घडलं?

Angkrish Raghuvanshi KKR vs LSG IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीला अंपायरने बाद देताच सगळ्यांनी रान पेटवलं; Obstructing The Field नेमका नियम काय?

आणखी वाचा

Comments are closed.