मनसेला बैठकीला बोलावलं नाही, रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मराठी सक्तीवरुन सरकार माघार घेण्याच्या तया
संदीप देशपांडे आणि संजय निरुपम: राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय लागू करण्यापूर्वी सोमवारी मंत्रालयात एक बैठक आयोजित केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी ही बैठक आयोजित केली आहे. मात्र, या बैठकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) निमंत्रण देण्यात आलेले नाही. ही सगळी परिस्थिती पाहता राज्य सरकार मराठी सक्तीच्या निर्णयावरुन बॅकफूटवर जाण्याच्या तयारीत असल्याचे वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केले. ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)
राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्याच्या निर्णयाची तारीख जाहीर करावी. मराठीचा मुद्दा मनसेच घेते. आम्ही या भूमिकेवर ठाम असतो. सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावे. आज आनंद दिघे असते तर संजय निरुपमसारख्याच्या दोन कानाखाली वाजवल्या असत्या. आता दिघे साहेब नाहीत, तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी निरुपमच्या कानाखाली वाजवाव्यात, किमान एक कानाखाली मारावी.ज्या अर्थी सरकारने आम्हाला बैठकीला बोलावले नाही, त्याअर्थी सरकार आपल्या निर्णयावरुन माघार घेण्याच्या तयारीत आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे व्यवहारी ज्ञान असलेच पाहिजे. आम्ही अशी अपेक्षा करत नाही की, त्यांनी पु.ल. देशपांडे वाचावेत, कुसुमाग्रज वाचावेत. पण त्यांना मराठी बोलीभाषा आली पाहिजे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
Sanjay Nirupam on Marathi: … मग कॉर्पोरेट आणि मोठ्या बँकांमध्ये काम करणाऱ्यांनाही मराठी सक्ती करा: संजय निरुपम
परिवहन मंत्री यांना पत्र पाठवलंय. अनेक जण मराठी बोलू शकतात, मात्र काही जण टेस्टमध्ये फेल झाले तर अडचण होईल. त्यांच्या उदरनिर्वाहाचे संकट निर्माण होऊ शकतो. रिक्षा चालकांनी बहुतेकांनी कर्ज घेतले आहे, जर परमिट रद्द झाला तर त्यांच्या समोर संकट निर्माण होईल. मुंबईत राहणारे लोक हिंदीत बोलून काम चालवून घेतात. भाषा प्रेमाचा विषय, संवादाचा विषय आहे. मात्र, हंटर चालवून, दबाव टाकत भाषा शिकवता येत नाही. मराठी सक्ती करायचीच असेल तर मग कॉर्पोरेट आणि मोठ्या बँकांमध्ये काम करणाऱ्यांनाही मराठी सक्ती करा, असे संदीप देशपांडे यांनी म्हणाले.
Sandeep Deshpande on Bageshwar Baba: बागेश्वर बाबाला चपलेने मारला पाहिजे: संदीप देशपांडे
बागेश्वर बाबाला चपलेने मारला पाहिजे. बागेश्वर बाबा मूर्ख, भोंदू आहे. उद्या त्याचंही अशोक खरातसारखं काहीतरी बाहेर येईल. बागेश्वर बाबाला इतकं महत्त्व देऊ नका, त्याची तेवढी लायकी नाही, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.