रायगडच्या लोणेरे तरुणीच्या मारेकऱ्याला अखेर 6 दिवसांनी बेड्या, सोशल मिडियावरील मैत्री अन्…

Raigad Lonere Crime रायगड : रायगड मधील लोणेरे तरुणी हत्याकांड (Lonere Crime case) प्रकरणात आरोपी असीम मोहमदखान मालदार या 38 वर्षीय आरोपीची अनेक कारणाने समोर आली आहेत. तब्बल 6 दिवसांनी रायगड पोलिसांनी (Raigad Police) या आरोपीला ठाण्यातून बेड्या ठोकत अटक केली आहे. माणगाव तालुक्यातील वडगावमध्ये राहणारी तरुणी पल्लवी मोरे (वय वर्ष 22) हिची या तरुणाबरोबर इंस्टाग्रामवर ओळख पटली आणि इथेच या दोघांमध्ये प्रेम संबंध जुळत गेले.

Lonere Crime Case : सोशल मिडियावरती मैत्री आणि थेट वादात रूपांतरण अन्….

पुढे या दोघांमध्ये सातत्याने भेटी-गाठी वाढत गेल्या. मात्र वर्षभर सुरू असलेल्या या दोघांच्या प्रेमात खटके उडू लागले आणि अनिस याला तरुणीच्या प्रेमात संशयाचे भूत उतरले. आपल्या प्रेयसीचे इतर दुसऱ्याबरोबर देखील प्रेम संबंध असल्याच समजताच त्याने तिचा काटा काढण्याचा डाव साधला आणि नेहमीच्या लॉजिंगला घेऊन जात तिला अखेर आयुष्यातून संपवले. सुरुवातीला अत्याचार आणि त्यानंतर तिच्या शरीरावर चाकूचे वार अनिस याच्या या क्रूरतेतून त्याचा राक्षसी स्वभाव यामधून दिसून येतो. दोन वेळच खायची परिस्थिती नसलेल्या या तरुणीच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी एका रस्ते अपघातात पायाला दुखापत झाघेतला होती. परिणामी घरातील बेडवरच खिळून बसलेल्या तिच्या वडिलांच्या जागेवर कुटुंब चालविण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती. त्यामुळे मिळेल ते काम करून तिने आपलं घर चालविणे सुरू ठेवलं होत. गोरेगाव शहरात एका ऑफिसमध्ये तिने काम सुरू केलं. मात्र सोशल मीडियाच्या आहारी जाऊन ओळख नसलेल्या एका अनोळखी व्यक्तीसोबत तिचे इंस्टाग्रामवर प्रेम संबंध जुळले. आणि पल्लवी आयुष्यातून जीवाला मुकली.

रायगड लोणेरे गुन्हे: मुंबईतून अनिसला बेड्या, प्रियांकाला मारणारा नराधम सापडला

आरोपी हा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील मालदार मोहल्यातील असून तो सद्यस्थितीत ठाण्यातील मुंब्रा येथे वास्तव्यास होता. स्वतःच्या पोटच्या 2 वर्षाच्या मुलीला देखील त्याने याआधी मारल्याची तक्रार ठाणे पोलिस ठाण्यामध्ये दाखल असल्याची माहिती मिळते. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला तलाक दिला होता. त्याच्या घटस्फोटानंतर त्याचे आणि पल्लवीचे गेल्या वर्षभरापासून घट्ट प्रेमाचे नाते जुळले होते. मात्र तरुणीच्या खुनानंतर त्याला काल रविवारी पहाटे पोलिसांच्या एका तुकडीने ठाण्यातून अटक केली आहे. त्याला येत्या 30 एप्रिलपर्यंत पोघेतलास कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोघेतलास उपविभागीय अधिकारी शंकर काळे आणि त्यांची टीम करते आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.