तरूणीचे व्हिडीओ बनवले अन्….; परतवाडा प्रकरणाची पुनरावृत्ती, सगळं मित्राला पाठवलं, फोनमध्ये 8

कोल्हापूर:  अमरावतीच्या परतवाडा येथील व्हिडीओ व्हायरल प्रकरण चर्चेत असतानाच आता कोल्हापुरात  (Kolhapur Crime News) देखील युवतींचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे याला या प्रकरणी अटक करण्यात आली, न्यायलयाने  (Kolhapur Crime News) त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तरुणीवर अत्याचार करून व्हिडीओ मित्राला शेअर केल्याचं उघड झालं आहे. तर आरोपी शाहिद सनदे याच्याकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. शाहिदचा मित्र शाहरुख देसाई मात्र फरार झाला आहे, पोलिसांचा शोध सुरू आहे. कारवाई करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून देखील पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे. (Kolhapur Crime News)

शाहिद समीर सनदे (रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) याने तरूणीवर अत्याचार करून तिचे व्हिडीओ बनवून मित्रांना शेअर केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत पिडीत तरूणीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केले. त्याला हातकणंगले पोलिस ठाण्याकडे सोपविण्यात आल्यानंतर येथे गुन्हा दाखल केला. हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी त्याला पेठवडगाव न्यायालयामध्ये सोमवारी हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. व्हिडिओ तयार करणारा त्याचा मित्र फरार असून, त्याच्याकडे इतर युवतींचे व्हिडीओ असल्याचा संशय आहे. (Kolhapur Crime News)

अमरावती, नाशिक येथील प्रकरणे गाजत असताना अशा प्रकरणाची पुनरावृत्ती हातकणंगले तालुक्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. शाहिद सनदे याने तरूणीचे व्हिडीओ काढले त्यानंतर ते मित्राबरोबर शेअर केले. तसेच या तरूणीच्या आठ ते दहा मैत्रिणींचे व्हिडीओ असल्याचा संशय पोलिसांना आहे. हे कोणाला सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी संशयितांनी दिल्याचे तक्रारदार युवतीने सांगितले

Amravati Crime News: परतवाडामधील व्हिडीओ व्हायरल प्रकरणाने खळबळ

परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरात अश्लील व्हिडीओ व्हायरल प्रकरणानं मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात 19 वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे (Pravin Tayade) यांच्या तक्रारीवरून परतवाडा पोलीस ठाण्यात POCSO आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस यंत्रणेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.परतवाडा शहरातील गटरमलपुरा परिसरातील एका युवकाने इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर तरुणी आणि महिलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित युवक महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा दावा केला जातोय. या व्हिडीओमुळे परतवाडा आणि अचलपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Sexual Exploitation Allegation : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शोषण?

या प्रकरणात आरोपीने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि त्याचं चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय.  भाजपचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा करत सुमारे 180 तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच 350 हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.