शिंदे गट उद्धव ठाकरेंची वाट अडवणार, विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात दहावा उमेदवार उतरवणार, शिवस
विधान परिषद निवडणूक 2026 शिवसेना: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) 9 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले असतानाच, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरला जात असतानाच, आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी दहावा उमेदवार मैदानात उतरवण्याचे संकेत देऊन खळबळ उडवून दिली आहे.
संजय निरुपम म्हणाले की, दहावा उमेदवार आम्ही देऊ शकतो, अशी चर्चा आहे. आमचे दोन उमेदवार निश्चितच संख्याबळाच्या जोरावर निवडून येतील. मात्र, उरलेले मत आणि अनेक छोटे पक्ष, अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. जर असं ठरलं की, आणखी एक उमेदवार मैदानात उतरविला पाहिजे, तर तसे होऊ शकते. दहावा उमेदवार कोणाच्याही उमेदवारीला (उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीला ) जोडून राहणार नाही. तो आमच्या संख्याबळाप्रमाणे राहील. आमचा संख्याबळावर विश्वास आहे. त्यामुळे समोर कोण आहे? यातून काही फरक पडत नाही. दहावा उमेदवारीबाबा तयारी सुरू झाली आहे का? हे मात्र मला माहित नाही, असे त्यांनी म्हटले.
Vidhan Parishad Election 2026 Shivsena: उद्धव ठाकरेंना बिनविरोध निवडून आणण्याची गरज नाही : निरुपम
तसेच, संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठा फरक आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल आदर असल्याने त्यांच्यासमोर उमेदवार न देण्याची भावना असू शकते. मात्र, उद्धव ठाकरे एवढे मोठे नेते नाहीत की त्यांच्यासाठी विधान परिषद निवडणूक बिनविरोध करावी.”
Vidhan Parishad Election 2026: मविआमध्ये पेच कायम
दुसरीकडे, महाविकास आघाडीमध्ये अद्याप संभ्रम कायम आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंना उमेदवारी घेण्याचा आग्रह केला आहे, परंतु ठाकरे स्वतः अद्याप इच्छुक नसल्याचे समजते. जर उद्धव ठाकरेंनी नकार दिला, तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे किंवा विनायक राऊत यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर, महायुतीचे पारडे जड असून त्यांना 8 जागा सहज मिळताना दिसत आहेत. अशातच शिंदे गटाने दहावा उमेदवार उभा केल्यास मविआच्या एकमेव जागेसाठी मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार
- उद्धव ठाकरे (शिवसेना – ठाकरे)
- नीलम गोऱ्हे (शिवसेना)
- शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
- अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
- गोपीचंद पडळकर (भाजप)
- रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
- राजेश राठोड (काँग्रेस)
- प्रवीण दटके (भाजप)
- रमेश कराड (भाजप)
Vidhan Parishad Byelection 2026 : विधान परिषदेची पोटनिवडणूक
- प्रज्ञा सातव
Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.