Vidhan Parishad  BJP Candidate List : विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर

मुंबई: राज्याचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकांच्या उमेदवारांपैकी पहिल्यांदा भाजपकडून 5 नावांची घोषणा झाली आहे. भाजपच्या संसदीय कमिटीच्या मान्यतेनंतर भाजपने अधिकृतपणे महाराष्ट्रातील 5 विधानपरिषदांच्या जागेसाठी पाच नावांची घोषणा केली. त्यामध्ये, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या प्रज्ञा सातव यांना पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. तर, अहिल्यानगरमधील विवेक कोल्हेंना संधी विधानपरिषदेची संधी मिळाली आहे. सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांना उमेदवारी जाहीर केली आहे.  विवेक कोल्हे यांचं नाव निश्चित झाल्याच्या कालपासून चर्चा सुरु होत्या. विवेक कोल्हे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. प्रमोद जठार हे सिंधुदुर्गमधील भाजप नेते असून त्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या 5 नावांमध्ये माधवी नाईक यांचंही नाव असून ते अनेक वर्षांपासून भाजप संघटनेत काम करतात. तर, संजय भेंडे भाजपचे उपाध्यक्ष असून ते नागपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, प्रमोद जठार यांनाही भाजपने संधी दिली असून जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. कोकणावर अन्याय होत असल्याची भावना भरुन काढण्याचा प्रयत्न भाजपकडून या उमेदवारीच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Comments are closed.