पुण्यात देहूरोड परिसर गोळीबाराच्या घटनेनं हादरला, भाजपचा सक्रीय कार्यकर्ता रमेश रेड्डीचा मृत्यू
पुणे (पिंपरी चिंचवड) : राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्यानं घडत असल्याचं पाहायला मिळतं. पुण्यातील देहूरोडमध्ये एका भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णालयात उपचार करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. भाजपच्या मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचं नाव रमेश रेड्डी असं आहे.
देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार
भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असलेल्या रमेश रेड्डी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात एकामागोमाग एक राऊंड फायर केलेत, यातील एक गोळी रमेश रेड्डी यांच्या मस्तकाला भेदून गेल्याने त्याना जखमी अवस्थेत देहूरोडच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं होतं. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता,.
रमेश रेड्डीचे नातेवाईक मित्र परिवाराने हॉस्पिटलमध्ये आक्रोश करत जुना पुणे मुंबई महामार्ग जाम करण्याचा प्रयत्न केला. पण देहूरोड पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रमेश रेड्डीचा मृतदेह पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात हलवण्यात आलाय, तर रमेश रेड्डीवर हल्ला झाल्याचं कारण पोलीस तपासात समोर येणार आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे देहूरोड बाजारातील दुकाने व्यापारी वर्गाने त्वरित बंद केली..या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
देहुरोडला गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी जखमी अवस्थेतील रमेश रेड्डी यांना रुग्णालयात नेलं, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. गोळीबारामुळं रमेश रेड्डी यांचा मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार देहुरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सवाना चौक येथे अग्निशस्त्र वापरुन एकावर हल्ला झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचताच रमेश रेड्डी याच्यावर अज्ञात इसमंनी गोळीबार केल्याचं निष्पन्न झालं. सवाना चौकातील आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रमेश रेड्डीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथकं पाठवली असल्याची माहिती देखील विशाल गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील हल्लेखोर कोण होते? कोणत्या हेतूनं रमेश रेड्डी यांच्यावर गोळीबार झाला, या सर्व गोष्टींचा तपास पिंपरी चिंचवड पोलिसांना करावा लागलणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.