IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला

IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला

आयपीएलच्या 40 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं 222 धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. राजस्थानं पंजाबवर 6 विकेटनं विजय मिळवला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंह आणि मार्कस स्टॉइनिस या दोघांनी अर्धशतकं केली. अखेरच्या ओव्हरमध्ये स्टोइनिस यानं 24 धावा काढल्या होत्या.राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि फरेरानं अर्धशतकं करत राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थानला वैभव सूर्यवंशीनं आक्रमक सुरुवात करुन दिली. वैभवनं 43 धावा केल्या, त्यामध्ये त्यानं पाच षटकार मारले होते.मुल्लानपूरमध्ये झालेल्या या सामन्यात राजस्थाननं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबकडून प्रियांश आर्यानं 11 बॉलमध्ये 29 धावा केल्या. प्रभसिमरन सिंह यानं 35 बॉलमध्ये अर्धशतक केलं. त्यानं 44 बॉलमध्ये 59 धावा केल्या. तर मार्कस स्टॉइनिस यानं 62 धावा केल्या.श्रेयस अय्यरनं 27 बॉलमध्ये 30 धावा केल्या. राजस्थानकडून यशराज पुंजा यानं 2 विकेट, नांद्रे बर्गर आणि जोफ्रा आर्चर यांनी एक एक विकेट घेतली. राजस्थानच्या डावाची सुरुवात आक्रमक झाली. वैभव सूर्यवंशीनं 16 बॉलमध्ये 43 धावा केल्या. तर, यशस्वी जयस्वालनं 51 धावा केल्या. ध्रुव जुरेल यानं 16 धावा, रियान पराग यानं 29 धावा केल्या.

Comments are closed.