कोणीही संभ्रमात राहू नये, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर…; मराठी अनिवार्यवरून प्रताप सरन
पुणे : महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी किंवा ओला-उबर असो, जर तुम्हाला राज्यात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे, असे रोखठोक वक्तव्य राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड बस आगाराच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी मराठी अनिवार्यबाबत ते बोलत होते.
Pratap Sarnaik: अनेकदा प्रवासी मराठीत बोलतात, चालकाला मराठी समजत नाही…
मराठी भाषेच्या सक्तीबाबत माहिती देताना सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, मराठी सक्तीचा नियम राज्य शासनाने १९८९ मध्येच केला होता, आता त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली आहे. १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी आणि कारवाई सुरू होणार आहे. अनेकदा प्रवासी मराठीत बोलतात आणि चालकाला मराठी समजत नाही, यातून वाद होऊन प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतात. हे टाळण्यासाठी चालकांना मराठी येणे अनिवार्य आहे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांनी साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे ती शिकावी, असा सल्लाही त्यांनी दिला. तर माजी आमदार बच्चू कडू यांच्या विधानपरिषदेवरील संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता सरनाईक म्हणाले की, बच्चू कडू हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते आहेत. शेतकरी आणि दिव्यांगांसाठी त्यांनी मोठे काम केले आहे. अशा कार्यकर्त्याला विधानपरिषदेवर संधी देण्याचा निर्णय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील. त्यांचा निर्णय आमच्या पक्षात अंतिम असतो आणि त्यात काहीही चुकीचे नाही. असही सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले आहेत.
Pratap Sarnaik: कोणीही संभ्रमात राहू नये, महाराष्ट्रात राहायचं असेल तर…..
1 मे पासून कारवाई ही होणारच, मराठी सक्तीचा नियम राज्य शासनाने १९८९ मध्येच केला होता, त्यामध्ये सुधारणा केली आहे गेल्या आठवड्यामध्ये परंतू जर महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे. भले तो रिक्षा चालक असो वा ओला, उबर चालक असो, प्रवासी जर मराठीत त्यांच्याशी बोलत असतील आणि जर त्याला मराठी समजत नसेल तर भांडण होतात, वादावादी होते, पोलिस स्टेशनला एफआयआर होतात, अनेक तक्रारींचे पाढे आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट केली, जर महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे. त्याचबरोबर मराठी शिकण्यासाठी साहित्यकांनी काही लिहलेली पुस्तके आहेत. त्यामुळे आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे कोणीही संभ्रमात राहू नये, महाराष्ट्रात राहायचं असेल तर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे, असंही पुढे प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.