भोरमध्ये चिमुरडीवर अत्याचार, 65 वर्षांच्या नराधमाबाबत धक्कादायक माहिती समोर, जुन्या विकृतीने पु

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चार वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Bhor Crime News) करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि त्यानंतर आज गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे आणि सोबतच या नराधमाला फाशीची शिक्षा द्या (Bhor Crime News)अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, नाहीतर आरोपीला आमच्या हाती द्या, आम्ही त्यांचं काय करायचं ते बघून असं म्हणत ग्रामस्थांनी घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे गावातील वातावरण तापलं असून पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाल्याचा पाहायला मिळाले. आमदार शंकर मांडेकर (Shankar Mandekar) देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत, तर या घटननेबाबत पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी माहिती दिली. (Pune Crime news)

Pune Crime news:  खेळत असताना तिला कशाची फूस लावली?

संदीपसिंग गिल म्हणाले, काल (शुक्रवारी, ता १) नसरापूर येथे दुदैवी घटना घडली. साडे तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केली. आम्ही एक दीड तासाच्या आत आरोपीला अटक केली, त्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आलेली होती. यात पॉक्सो सह इतर कलम लावण्यात आले आहेत. राजगड पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला तपास केला जातोय. या घटनामध्ये लोक भावनिक आहे, काही वेळ लोक रस्त्यावर आले होते,आम्ही तपास करत आहोत. आरोपीबाबत माहिती नसताना तांत्रिक तपास करून अटक केली आहे, लोकांनी सहकार्य केलं आहे, तातडीने दोषारोपपत्र दाखल करून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चलवावी म्हणून आम्ही आग्रही आहे. आरोपीवर १९९८, २०१५ साली गुन्हा दाखल होते, त्यातून मुक्त झाला आहे, दोन्ही विनयभंग गुन्हे दाखल आहे, वयस्कर आहे, त्याची प्रवृत्ती तशीच आहे. गावात असाच फिरत असतो, आजूबाजूला गावात छोटे मोठे काम करत असतो. मुलगी आजीकडे आली होती, गावात जास्त लोक नसतात, खेळत असताना तिला कशाची फूस लावली याचा तपास करत आहोत, अशी माहिती देखील संदीपसिंग गिल यांनी दिली आहे.

Pune Crime news:   पुण्याच्या नसरापुरात संतप्त नागरिकांचा ठिय्या

पोलीस आणि नसरापुरातील ग्रामस्थांची बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली आहे, ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता, गावातील सुपर मार्केटच्या चौकामध्ये ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन पुकारला आहे. पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. याच दरम्यान पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. पोलीस ग्रामस्थांची समजूत काढत आहेत की आम्ही आरोपीला ताब्यात घेतलं आहे सर्व तपास सुरू आहे, त्यानंतर हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात दाखल करू, पोलीस त्यांना शब्द देत आहेत मात्र तुम्हाला आरोपी मिळाला आहे तो आमच्या ताब्यात द्या, नाहीतर त्याला फाशीची शिक्षा करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी ग्रामस्थांशी बोलताना हुल्लडबाजी करू नका आम्हाला, आमचा तपास करू द्या, असा शब्द वापरला. त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले, त्यानंतर थेट तुम्ही तुमचं काम करा. आम्हाला पुन्हा एकदा सगळं बंद करायला भाग पाडू नका, असं ग्रामस्थांनी पोलिसांना म्हटलं. घटनास्थळी स्थानिक आमदार शंकर मांडेकर दाखल झालेले आहेत. मांडेकर देखील ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत, ज्याप्रकारे मुलीला निर्दयीपणे संपवण्यात आलं, तसंच पुन्हा काही घडू नये यासाठी सर्व ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत, भर उन्हात सर्व ग्रामस्थ गावातील चौकात येऊन थांबलेले आहेत, या घटनेतील जो नराधम आहे, त्याला आमच्या ताब्यात द्या, ज्या गोठ्यात त्याने त्या चिमुकलीसोबत ते कृत्य केलं, त्याच गोठ्यात त्याला फाशीची शिक्षा द्या, नाहीतर आमच्या हवाली करा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Pune Crime news:  नसरापुर मध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभर

स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना फोन लावून गावकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मांडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचा देखील फोनवरती संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान गावकऱ्यांनी आक्रोश करत आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा फाशी द्या या दोनच मागण्या केल्या आणि त्या मागणीवरती ठाम राहिले. यादरम्यान आजी-माजी आमदार एकत्र येऊन गावकऱ्यांची त्यांनी समजूत काढली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.