शिरखुर्मा अन् थंड पेयातून दिलं गुंगीचं औषध, नंतर महिलांसोबत नराधमांनी नको नको ते केलं; नाशिक TC
नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचे प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर व धक्कादायक वळण घेत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (SIT) हाती अत्यंत खळबळजनक पुरावे लागले असून, आरोपींनी पीडित महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी अमानवीय मार्गांचा अवलंब केल्याचे समोर आले आहे.
Nashik Crime News: शिरखुर्मा आणि थंड पेयातून गुंगीचे औषध
SIT च्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींनी पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांना शिरखुर्मा आणि काही थंड पेयांमधून गुंगीकारक पदार्थ मिसळून दिले होते. या गुंगीकारक पदार्थांच्या प्रभावाखाली असलेल्या महिलांवर आरोपींनी लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, या महिलांचे मनपरिवर्तन करून त्यांचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जात होते.
Nashik Crime News: धर्मांतरासाठी परकीय फंडिंगचा संशय
या संपूर्ण प्रकरणामागे केवळ गुन्हेगारी प्रवृत्ती नसून एक मोठे धार्मिक षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे. आरोपींचे बँक स्टेटमेंट्स आणि KYC कागदपत्रे तपासली असता, तरुणींचे धर्मांतर करण्यासाठी काही संशयास्पद फंडिंग झाल्याचे पुरावे SIT ला आढळले आहेत. या फंडिंगचा मूळ स्त्रोत काय आणि हे रॅकेट किती मोठे आहे, यादृष्टीने तपास सुरू आहे.
Nashik Crime News: मुख्य संशयित निदा खानचा जामीन फेटाळला
या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावला आहे. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात मांडलेला प्रभावी युक्तिवाद आणि SIT ने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिला दिलासा देण्यास नकार दिला. निदा सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
Nashik Crime News: आरोपींच्या कोठडीत वाढ
शनिवारी (2 मे) या प्रकरणातील तौसीफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख आणि रझा मेमन या चार संशयित आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा चार दिवसांची वाढ केली आहे. दुसरीकडे, आसिफ अन्सारी, शफी शेख आणि कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.