पतीला संपवण्यासाठी पत्नीनेच दिली 1 लाखाची सुपारी, शाळेच्या परिसरात आढळला पतीचा मृतदेह, चंद्रपूर

चंद्रपूर क्राईम न्यूज : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीकडूनच पतीला संपवण्याची सुपारी देण्यात आली आहे. पतीला संपवण्यासाठी पत्नीनेच 1 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पतीचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

2 मे  रोजी घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ हनुमान मंदिराशेजारी एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृताची ओळख रविंद्र तुळशिराम कुळमेथे वय (46) गडचिरोली अशी पटवली. तपासात मृतकाची पत्नी दिपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रविण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना १ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे निष्पन्न झाले. 1 मे रोजी आरोपींनी मृतकाला कारमध्ये बसवून घोडपेठ येथील सुनसान ठिकाणी नेले. तिथे कारमध्येच त्याचा गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले होते. भद्रावती पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दिपमाला कुळमेथे व वर्षा परचाके यांना वरोरा येथून तर सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती कार, तीन मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

अमरावतील वंचितचा नगरसेवक मोहम्मद रेहान उर्फ बल्ला याच्यावर अपहरणाचा आणि मारहानीचा गुन्हा दाखल

अमरावतील वंचितचा नगरसेवक मोहम्मद रेहान उर्फ बल्ला याच्यावर अपहरणाचा आणि मारहानीचा गुन्हा दाखल झाला आहे. नगरसेवक मोहम्मद रेहान उर्फ बल्ला याने वाहन चालकाला मारहाण करतानाचे CCTV समोर आले आहेत.  चालक मोहम्मद साजीद मोहम्मद रफीक यांनी तक्रार दिली की, माझ्या पिकअप वाहनात 25 पोते कपाशीची सरकी होती. त्यातले 14 पोते हे मी विकले आणि राहिलेले 11 पोते वाहनात होते. दिनांक 27 एप्रिलला रात्री 12 वाजता बडनेरा याठिकाणी घेऊन जात असतांना समर्थवाडी परिसरात रात्री 12.15 वाजता तीन मोटर सायकल वरून पाच लोकं आले आणि त्यांनी वाहन अडवून मला नमुना गल्लीत वाहन घेऊन चल असे सांगितले त्यानंतर त्याठिकाणी त्यातील एक ओळखीचा असलेला वंचितचा नगरसेवक मोहम्मद रेहान उर्फ बल्ला यांनी लोखंडी रॉडने मला मारहाण केली आणि इतर त्यांच्या साथीदाराने लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मी जखमी झालो आणि मला माझ्या भावाने जिल्हा रुग्णालयात भरती केले. अशी तक्रार बडनेरा पोलीस ठाण्यात देण्यात आली. या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेवक मोहम्मद रेहान उर्फ बल्ला याच्यावर अपहरणाचा आणि मारहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.