सायबर पोलीस निरीक्षकांसह 9 अधिकारी अन् कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?
नागपूर पोलिसांची निलंबनाची कारवाई नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये अवघ्या पाचशे रुपयांच्या तक्रारी संदर्भात झालेल्या एका वादग्रस्त कारवाई संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासाअंती तब्बल 9 पोलीस (Nagpur Police) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबित (Police Suspension Action) करण्यात आलेल्या पोलिसांमध्ये दोन पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे पोलीस दलासह नागपूर (नागपूर गुन्हे) शहारत एकच खळबळ उडाली आहे.
Nagpur Police : पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबलमध्ये हाणामारी
नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 16 महिन्यात नागपूरकरांच्या फसवणुकीचे 120 प्रकरण प्रलंबित असताना, तसेच या प्रकारणांमध्ये नागपूरकरांचे 58 कोटी रुपये अडकले असताना, सायबर पोलीस स्टेशनच्या एका पथकाने त्या प्रकरणाकडे लक्ष न घालता अवघ्या पाचशे रुपयांच्या फसवणुकीच्या एका कथित प्रकरणात विमानाने मुंबई आणि पुणे गाठत रेड केली होती. त्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार होऊन ती कारवाई ही थंड बस्त्यात टाकण्यात आल्याचा आरोप झाला होता. पाचशे रुपयांच्या तक्रारीसाठीची आणि नंतर थंड बसतात टाकण्यात आलेली ती रेड आणि त्याची माहिती काही पत्रकारांपर्यंत कशी पोहोचली, या मुद्द्यावरून सायबर पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल ठाकरे यांच्यामध्ये हाणामारी झाली होती. या हाणामारी दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय राणे यांनी पोलीस कर्मचारी प्रफुल्ल ठाकरेचा मोबाईल हिसकावून घेतल्याचाही आरोप झाला होता.
सायबर पोलीस निरीक्षकांसह 9 अधिकारी अन् कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई (Police Suspension Action)
दरम्यान, या प्रकारनंतर प्रफुल्ल ठाकरे जवळपास 36 तास बेपत्ता झाले होते. यावर एबीपी माझाने हाणामारीनंतर पोलीस कर्मचारी बेपत्ता असून कुटुंबीयांनी तक्रार अशी बातमी 25 एप्रिलला दाखवली होती. एबीपी माझाच्या बातमीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली होती. अशातच चौकशीअंती याप्रकरणी दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हाणामारीचा आरोप लागलेले सहायक पोलीस निरीक्षक विजय राणे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल ठाकरे यांच्यासह इतर पाच पोलीस कर्मचारी अशा एकूण नऊ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
सायबर पोलीस स्टेशनचा चार्ज ज्या दोन डीसीपींकडे होता. तो चार्ज ही काढून नवे डीसीपी दीपक अग्रवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. फक्त या घटनेने पोलीस विभागासह नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर इतर प्रलंबित प्रकरणाचा आता तरी बाहेर काढणे लागून तक्रारदार नागपूरकरांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.