उपकरप्राप्त, बिगर उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी पावसाळ्यापूर्वी निधी द्या, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
उपकरप्राप्त पागडी इमारती आणि उपनगरांतील बिगर उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी पावसाळय़ापूर्वी तातडीने निधी द्या, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
आदित्य ठाकरे यांनी यापूर्वीही ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्मरणपत्र दिले आहे. महाविकास आघाडीच्या काळात उपकरप्राप्त पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी नियम 79-ए (1) (अ) आणि 79-ए (1) (बी) हा कायदा करण्यात आला होता. मागील दोन वर्षांपासून ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मुंबईतील सुमारे 14 हजार इमारतींमधील लाखो रहिवासी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
सर्व भाडेकरूंसाठी विशेष मोहीम राबवून त्यांची योग्यप्रकारे नोंद करून घ्यावी.
सर्व भाडेकरूंना त्यांच्या जागा मालकांच्या दादागिरी तसेच निष्कासनाच्या कारवाईपासून संरक्षण द्यावे.
यातील ज्या इमारतींना दुरुस्ती व डागडुजीची आवश्यकता आहे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या विशेष अधिकारातून येत्या पावसाळय़ापूर्वी तातडीचा निधी उपलब्ध करून द्यावा.
न्यायालयात प्रलंबित प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे.
Comments are closed.