मुंबईतील कुटुंबाचा मृत्यू विषारी पदार्थामुळे झाल्याचे उघड, पण जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांचं पथ

मुंबई : मुंबईच्या पायधुनी परिसरात काही दिवसांपूर्वी संपूर्ण कुटुंबाचा संशयास्पदपणे मृत्यू झाला होता. पायधुनीच्या घाटी परिसरातील  मोगल उमरेट्टी इमारतीमध्ये ही घटना घडली होती. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या मुली आयशा व झैनब अशी मृतांची नावे आहेत. या चौघांना विषबाधा झाली होती आणि उलट्या-जुलाब होऊन या सगळ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांनी मृत्यू झाला त्याआधी बिर्याणी खाल्ली होती आणि त्यानंतर कलिंगड (Watermelon) खाल्ले होते. याच कलिंगडातून त्यांना विषबाधा (Food Poison) झाली असावी, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या फॉरेन्सिक अहवालात या चौघांचा मृत्यू कलिंगड किंवा बिर्याणीतील विषबाधेमुळे नव्हे तर विषारी पदार्थामुळे झाल्याचे स्पष्ट झाले होते. या चौघांच्या अंतर्गत अवयवांमध्ये (यकृत, मूत्रपिंड, प्लीहा यांचे नमुने), पोटातील अन्न, पित्त आणि पोटातील चरबीच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळून आले होते. तसेच घरात आढळलेल्या कलिंगडातही झिंक फॉस्फाइड आढळून आले होते. हे झिंक फॉस्फाईड उंदीर मारण्याच्या औषधात वापरले जाते. (Mumbai Crime news) तर आता डोकाडीया कुटुंबीयांच्या शरीरातून तसेच जप्त करण्यात आलेल्या कलिंगडाच्या नमुन्यात झिंग फॉस्फाईड सापडल्याने मृत्यूचं कारण जरी हे विषारी रसायन असलं तरी त्याला डॉक्टरांच्या पुष्टीची आवश्यकता आहे.

Mumbai Family death Pydhonie: डॉक्टरांचा अहवाल मृत्यूच्या अंतिम कारणासह अनेक प्रश्नाचा उलगडा करेल

पायधूनीतील चौघांच्या मृत्यूप्रकरणी डोकाडीया कुटुंबीयांच्या शरीरातून तसेच घरातून जप्त करण्यात आलेल्या कलिंगडाच्या नमुन्यात झिंग फॉस्फाईड सापडल्याने मृत्यूचं कारण जरी हे विषारी रसायन असलं तरी त्याला डॉक्टरांच्या पुष्टीची आवश्यकता आहे. पोलीस एफसीएलचा अहवाल सर जे जे रुग्णालयाच्या तज्ञांना सोपवतील जे मृत्यूची अचूक कारणे आणि याप्रकरणी अद्याप अनुत्तरित असलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देतील. जे जे रुग्णालयाचे न्यायवैद्यक शस्त्र विभागाचे तज्ञ तसेच इतर विभागातील तज्ञ डॉक्टरांचं पथक आता या अहवालाचा सखोल अभ्यास करणार आहे. यावेळी चौघांना झालेली विषबाधा, तीच स्वरूप, विषबाधा झाल्यानंतर समोर आलेली लक्षणे त्यांची खालावलेली परिस्थिती तिचा वेग या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या मृत्यूच स्वरूप, मृत्यूच प्रकार, मृत्यू होण्याची वैद्यकीय प्रक्रिया या चौघांना कोणते गंभीर आजार असल्यास या सगळ्यांची जोडणी करून जे जे रुग्णालयाच्या तज्ञ पथक करणार आहे. या प्रकरणातील डॉक्टरांचा अहवाल मृत्यूच्या अंतिम कारणासह अनेक प्रश्नाचा उलगडा करेल.

Mumbai Family death Pydhonie: कुटुंब राहत असलेल्या घरातून उंदीर मारण्याचे औषध सापडले

डोकाडिया कुटुंब राहत असलेल्या घरातून उंदीर मारण्याचे औषध सापडले आहे. उंदीर मारण्याच्या दोन वड्या आणि उंदीर मारण्याचा स्प्रे घरातून जप्त करण्यात आला आहे. उंदीर मारण्याच्या वड्यांच पाकीट सीलबंद अवस्थेत असून स्प्रेचा वापर झाल्याचे तपासात समोर आले आहे. मुघल बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर उंदीर आहेत. डोकाडिया कुटुंबातील चौघांचाही मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधाने झाल्याचे एफएसएलच्या चाचणीत समोर आले आहे. हे औषध डोकाडिया कुटुंबाच्या शरीरात कसे गेले, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे हा घातपात असावा की आत्महत्या अशी चर्चाही रंगली आहे. अब्दुल्ला व आयेशा यांचा उपचारादरम्यान जबाब नोंदविण्यात आला होता. त्यांनीही बिर्याणी नंतर कलिंगड खाल्ल्याचे म्हटले होते. तसेच आत्महत्या करत असल्याबाबत किंवा कुणावर संशय व्यक्त करणारी काहीही माहिती त्यामधून समोर आलेली नव्हती. जे. जे. मार्ग पोलिसांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत केलेल्या तपासात कुठलीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.