अवैध गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश; भाजप पदाधिकारी असलेल्या डॉक्टरसह चार जणांवर गुन्हा दाखल
वाशिम मालेगाव गुन्हा: वाशिमच्या मालेगाव शहरात स्त्री भ्रूणलिंग चाचणी प्रकरण (Illegal Gender Test) उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात भाजप पदाधिकारी तथा माजी सरपंच डॉ. विवेक माने यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा (Washim Malegaon Crime) दाखल करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई (Malegaon Crime)करत दवाखान्यावर छापा टाकला. मात्र, या प्रकरणात राजकीय दबाव होत असल्याचं दिसतंय. डॉ. माने यांच्या पत्नीचे नाव पोलीस तक्रारीवरून गायब दिसत असून अज्ञात महिला डॉक्टर असं दिसत असल्याचे बोललं जात आहे. (बेकायदेशीर लिंग निर्धारण रॅकेट)
Illegal Gender Test: आरोग्य विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
वाशिमच्या मालेगाव शहरातील भाजप पदाधिकारी आणि माजी सरपंच डॉ. विवेक माने यांच्या दवाखान्यावर आरोग्य विभागाने छापा टाकत अवैध स्त्री भ्रूणलिंग चाचणी प्रकरण उघड केलंय. आरोग्य विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील एका गावातील व्यक्तीला महिलेला बनावट रुग्ण म्हणून पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत डॉ. विवेक माने, यांच्या सह अज्ञात महिला डॉक्टर आणि इतर तिघांविरोधात मालेगाव पोघेतलास ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Washim Malegaon Crime : राजकीय दबावामुळे पत्नीचं नाव डावललं? चर्चेला उधाण
मात्र, या प्रकरणात राजकीय दबाव असल्याच स्पष्ट होतंय. डॉ विवेक माने यांच्या पत्नीचे नाव कमी करत अज्ञात महिला डॉक्टर आरोपी असा, उल्लेख केला गेल्याने चर्चेला उधाण आलंय. कारण, डॉ. विवेक माने यांच्या पत्नी शिवगामी माने यांचे नाव दवाखाना आहे आणि सोनोग्राफी सेंटर आहे. मात्र, आरोप पत्रात एफआयआरमध्ये स्पष्टपणे नाव अज्ञात नमूद असल्याने पोलीस आणि आरोग्य विभागाने अर्थपूर्ण नाव कमी केल्याचा संशय आहे. दरम्यान, बेटी बचाओ, बेटी पढाओ, लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरण, सारख्या अभियानांचा प्रचार करणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवरच असे गंभीर आरोप झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
कोण आहेत डॉ. विवेक माने?
डॉ. विवेक माने हे भाजप चे सक्रिय कार्यकर्ते असुन 2009 पासून वाशिम विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. अनेक राजकीय बड्या नेत्यांशी त्यांची राजकीय जवळीक आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय दबावच्या दृष्टिकोनातूनही पाहिले जातय. संपूर्ण प्रकरणाचा तपास मालेगाव पोघेतलास आणि आरोग्य विभागाकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.