रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या! सुशांत शेलार म्हणाले,

मुंबई : नाशिकमधील भोंदू अशोक खरात (Ashok kharat) लैंगिक अत्याचार प्रकरण आता पडद्यावर झळकणार आहे. लवकरच या चित्रपटाचे शुटींग सुरू होणार असून चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. मात्र, दीपाली सय्यद यांनी चित्रपटात काम करू नये, रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये, असे म्हणत दीपाली (Dipali sayyad) यांना धमक्या येत असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. अशोक खरात प्रकरणावर चित्रपट (Cinema) येत असताना आणि रोल करत असताना कोणीही कलाकाराला दबावात आणू नये. मला काही धमक्यांचे फोन येत आहेत, पण कर नाही त्याला डर कशाचा? हे माझं प्रोफेशन आहे आणि हे न करण्यासाठी जर मला फोन येत असतील तर हे चुकीचं आहे, असे शिवसेनेतील नेत्या तथा अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी म्हटले. यावरती शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष, सुशांत शेलार यांनी दीपाली सय्यद यांना पाठिंबा दिला आहे.

सुशांत शेलार दीपाली सय्यदवर : सुशांत शेलारला काय म्हणाले?

सुशांत शेलार म्हणाले की, दीपाली सय्यद या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, त्यांनी अनेक सिनेमात आणि मालिकात कामं केलं आहे. कोणत्याही कलाकाराला भूमिका सकारू नये अशी धमकी येणे चुकीचे आहे. शिवसेना चित्रपट सेना दीपाली सय्यद यांच्या पाठीशी उभा राहिलं, दीपाली ताईंनी अशा कुठल्याही धमक्याना भीक घालू नये. त्यांचा स्वभाव घाबरणारा नाही, त्यांचं सामाजिक क्षेत्रातला काम आपण सर्वानी पाहिलं आहे. अभिनेत्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे कुठली भूमिका करायची, नाही करायची हे तेच ठरवतील. दीपाली ताई ह्या उत्तम अभिनेत्री आहेत, त्यामुळे कोणती भूमिका करायची, करायची नाही हे त्यांचं त्यांनीच ठरवायचं आहे. तो सिनेमा काय असेल हे अजून कोणालाच माहिती नाही, भूमिका चांगली देखील असू शकते. त्यामुळे आधीच अशा पद्धतीने धमक्या देणे योग्य नाही. 20 पैसे पर कमेंट अशी लोक विरोधकांनी बसवून ठेवली आहेत, असंही पुढे सुशांत शेलार यांनी म्हटलं आहे.

Dipali sayyad Movie: नेमकं प्रकरण काय?

दिग्दर्शक स्वरूप बी सावंत यांचा महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स नावाने अशोक खरातच्या काळ्या कृत्यावर आधारित सिनेमा लवकरच येत आहे. त्याच अनुषंगाने अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी, आपल्याला फोनवरुन धमक्या येत असल्याचंही त्यांनी म्हटलं. खरात प्रकरणावरचा चित्रपट करू नका, हा रोल करू नका, असे म्हणत काहीजण थोडसं थांबायला सांगत आहेत. मला राजकीय प्रेशर दिलं जातय, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करतील असा मला महिला नेत्यांचा फोन आला होता, असे दिपाली सय्यद यांनी म्हटलं.

Dipali sayyad Movie: एकनाथ शिंदेंना भेटणार

मला तुम्ही फोन का करताय? राजकीय महिला नेत्या आहेत, त्यांचा रोल मी करते. मी या प्रेशरला घाबरत नाही आणि मी काम करणार आहे. मी माझ्या पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे, मी एकनाथ शिंदेश्रीकांत शिंदे यांच्याशी या सगळ्या संदर्भात बोलेन. मी त्यांच्यासमोर हे ओपन करणार आहे की मला या या लोकांचे फोन येत आहेत, असेही दिपाली सय्यद यांनी म्हटलं. मी कलाकार आहे, कोणाची परमिशन घेऊन काम करत नाही. दोन-तीन दिवसांपूर्वीच या सगळ्या चित्रपटा संदर्भात चर्चा सुरू झाली. कालच मला ‘महाराष्ट्र एफस्टीन फाईल’ची स्क्रिप्ट मिळाली. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला कळालं हे असं सगळं प्रकरण आहे. चार महिने मी बिग बॉसमध्ये होते, त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणात काय झालं? हे मला माहित नव्हतं, पण बाहेर आल्यानंतर कळलं आहे, असेही दिपाली यांनी म्हटलं.

Dipali sayyad Movie: 2 ऑक्टोबरला चित्रपट रिलीज, रुपाली चाकणकरांचा रोल?

मोठ मोठी लोक या सगळ्या खरात प्रकरणामध्ये सहभागी आहेत आणि त्यामुळे अशी प्रकरण थांबली पाहिजे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक लाईन असते ती आपल्याला माहिती असली पाहिजे. आपण किती लोकांवर श्रद्धा आणि अंधश्रद्धा ठेवली पाहिजे, हे लोकांना कळलं पाहिजे. मी रोल तुम्हाला कन्फर्म सांगत नाही आणि मी कोणाशीही या रोल संदर्भात चर्चा करणार नाही. 2 ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होणार आहे आणि पुढच्या महिन्यात शुटिंग सुरू होईल, त्याच्यामुळे कुठला रोल मी करती हे तुम्हाला कळेलच, असे म्हणत दिपीली सय्यद यांनी चित्रपटातील आपला रोल गुपित ठेवला आहे. अशोक खरात कुठल्या बाबतीतले गुरु होते हे तुम्हाला कळलं पाहिजे होतं, आकडा ते सांगायचे. तुम्हाला काहीतरी करायला सांगायचे, तुम्हाला काहीतरी प्यायला द्यायचे, हे असे प्यायला वगैरे देणारे गुरु कसे असू शकतात. रूपाली चाकणकरांची चूक आहे की नाही हे स्क्रिप्ट पूर्णपणे वाचल्यानंतर मला कळेल, असेही दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ‘आता सगळं उघड होणार…!’ हि टॅगलाईन हा चित्रपट अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचे संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. आता हा चित्रपट कोणकोणत्या गोष्टी उघड करतो, ते प्रदर्शनानंतरच समजेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांचे सभ्यतेचे मुखवटे आपोआप गळून पडणार आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.