तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि

तुकाराम मुंढे FDA छापे: डॅशिंग आणि कोणालाही न घाबरणारे अधिकारी म्हणून लौकिक असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाच्या (FDA) आयुक्तपदाच्या कारभाराची सूत्रे हाती घेतल्यापासून भेसळखोरांविरोधात आणि गुटखा-पानमसाला (Pan Masala) विकणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे आयुक्त झालेल्या क्षणापासून अन्न व औषध विभाग कमालीचा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांत 40 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. 30 मे आणि 31 मे रोजी झालेल्या कारवाईत 32 आरोपींना अटक करण्यात आले असून 24 एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.  तसेच या कारवाईदरम्यान 26 आस्थापनांना सील ठोकण्यात आले असून 12.16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  (Maharashtra Crime news)

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात राबवविलेल्या धाडसत्रात  कोकण विभागात सर्वाधिक 16 आरोपी अटकेत आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 11 ठिकाणी कारवाई करण्यात आली असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, पुणे, नाशिकमध्ये वाहनांसह मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत. या वाहनांची किंमत 2.60 लाख रुपयांच्या घरात आहे. भारतीय दंडसंहिता कलम 123, 223, 204, 275 अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच संबंधित आरोपींवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गतही कठोर कारवाई करण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांना चाप लावण्यासाठी अत्यंत आक्रमक पावले उचलली आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून अन्नभेसळीच्या तक्रारींसाठी नवीन ॲप आणि टोल-फ्री क्रमांक लवकरच सुरु केला जाणार आहे. तसेच प्रतिबंधित गुटखा (Gutkha) विक्रीविरोधातील मोहीम आणखी तीव्र होणार आहे. आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी 25 मे रोजी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर अवघ्या आठवडाभरात त्यांनी भेसळखोर आणि प्रतिबंधित गुटखा विकणाऱ्यांना सळो की पळो करुन सोडले आहे.

Pune Crime: आंबेगाव-खेडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक; 19 लाखांचा साठा जप्त

पुणे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त आणि बेकायदेशीर अन्नपदार्थांवर मोठी कारवाई केली आहे. आंबेगाव आणि खेड तालुक्यातील पाच ठिकाणी धाड टाकून तब्बल १९ लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये गुटखा, पानमसाला, अप्रमाणित सुपारी तसेच संशयित अन्नपदार्थांचा समावेश आहे. काही आस्थापना विनापरवाना व्यवसाय करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

आणखी वाचा

फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल

आणखी वाचा

Comments are closed.