गुजरातमधील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांची कारवाई, 80 कोटींचे अंमली पदार्थ; दारु अड्डेही उध्वस्त

मुंबई: पुणे, पिंपरी चिंचवडमधील विषारी दारुप्रकरणात 24 जणांचा बळी गेल्याने राज्यात गेल्या काही दिवसांत अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांच्या (Police) कारवाईला वेग आला आहे. त्यामध्ये, अवैध दारुसह, ड्रग्ज प्रकरणातही पोलिसांकडून धाडी टाकून कारवाई केली जात आहे. त्यातच, गुजरात राज्यामध्ये औषधे फॅक्टरीवर कारवाई करून तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. तर, कोल्हापुरातही राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाडी टाकत 100 ठिकाणी छापेमारी केली आहे. तर, मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई करत 80 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. याप्रकरणी, अधिक तपास सुरू आहे.

मुंबईतील साकीनाका पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील मोठी कारवाई करत तब्बल 80 कोटी किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणात अमली पदार्थांच्या अवैध तस्करीशी संबंधित काही आरोपींवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचा स्रोत, पुरवठा साखळी आणि आंतरराज्यीय अथवा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी असलेले संबंध तपासण्यासाठी साकीनाका पोलीस सखोल चौकशी करत आहेत. या ड्रग्स फॅक्टरी कारवाईमध्ये आणखी अटक आणि मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोल्हापुरात 100 ठिकाणी धाडी, दारु अड्डे उध्वस्त

पुणे इथल्या विषारी दारू प्रकरणानंतर कोल्हापूर जिल्ह्यात 100 पेक्षा अधिक ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी केली आहे. कारवाईत 78 हातभट्टी दारू अड्डे उध्वस्त केले असून याप्रकरणी 62 आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व कारवाईत 14 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला असल्याची माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांनी दिली. कोल्हापुरातील या कारवाई नंतर अवैध हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पुणे विषारी दारू कांडानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर हातभट्ट्या दारू निर्मितीवर कारवाई सुरू असून 29 तारखेपासून दिवस-रात्र  कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

ह्रदयद्रावक… मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या युवकावर वीज कोसळली; 1 ठार एक जखमी, सुदैवाने तिघे बचावले

आणखी वाचा

Comments are closed.