अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक, लोहगावमध्ये भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे : अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्यां भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधश्रद्धा, करणीबाधा, भूतबाधा आणि अघोरी पूजांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कमलेश शिवकुमार अधिकारी आणि गौरी कमलेश अधिकारी यांच्याविरोधात पुण्यातील लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम, 2013 मधील संबंधित कलमे लागू केली आहेत.

लोहगाव येथील रत्ना अशोक वाघ-पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसाj हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्ना वाघ यऻंचॆ डिसेंबर 2023 ते जून 2024 या कालावधीत आरोपींनी करणीबाधा, भूतबाधा व तंत्रविद्येचा त्रास असल्याची भीती दाखवून विविध अघोरी पूजा, स्मशानातील विधी, होमहवन व धार्मिक अनुष्ठानांच्या नावाखाली त्यांच्याकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून सुमारे 3 लाख 90 हजार रुपयांची रक्कम उकळली. संबंधित आरोपींविरोधात नाशिक येथेही तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक पीडित नागरिक एकत्र आले. या प्रकरणात हडपसर येथील म.अंनिसचे कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पीडित महिलेची फसवणूक नवंपुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरात झाल्यामुळे गुन्हा संबंधित अधिकार क्षेत्रातील लोहगाव पोलीस ठाण्यातच नोंदविला जावा, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला .

आणखी वाचा

Comments are closed.