हुंड्यासाठी मानसिक त्रास, गेवराईत विवाहितेनं संपवलं जीवन, पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पलंग: बीडच्या गेवराई शहरातील 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी पती, सासू-सासरे, दीर, जाऊ आणि नणंद यांच्यावर हुंड्यासाठी आणि पैशांच्या मागणीमुळे मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पूजा प्रमोद सुरवसे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळ
पूजाने गेवराई शहरातील गजानन नगर परिसरात राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला होता. त्यानंतर सायंकाळी तिच्या वडिलांना फोन करून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने गेवराई येथील शासकीय रुग्णालय गाठले असता तेथे पूजाचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेच्या भावाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर पती प्रमोद साईनाथ सुरवसे, सासरे साईनाथ बापुराव सुरवसे, सासू उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे, दीर गणेश साईनाथ सुरवसे, जाऊ आरती गणेश सुरवसे आणि नणंद अर्चना तुळसे यांनी व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून पूजाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
मूळची परभणी येथील रहिवासी असलेल्या पूजाचे वर्षभरापूर्वीच प्रमोद सुरवसे याच्याशी लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही आनंदाने सुरू होते. परंतु सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचं पूजाने आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. दरम्यान, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपासानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये धक्कादायक घटना, मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे मिळाले नाहीत म्हणून मुलीनं उचललं टोकाचं पाऊल
पालघर जिल्ह्यातील विरार (Virar) परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. मोबाईलचा डिस्प्ले खराब झाल्यामुळे तो दुरुस्त करण्यासाठी घरातून पैसे न मिळाल्यानं नाराज झालेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण विरार परिसरामध्ये कमालीची हळहळ व्यक्त केली जात आहे.
घरातच ओढणीने घेतला गळफास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता महादेव सलगरे (वय 17) असं मृत पावलेल्या दुर्दैवी मुलीचं नाव आहे. ती आपल्या आईसोबत विरार पूर्व येथील गडगापाडा परिसरातील ‘आय जीवदानी दर्शन’ चाळीमध्ये राहत होती. रविवारी रात्री साधारण 10.45 वाजेच्या सुमारास जेव्हा घरात सर्व जण होते, तेव्हा अनिताने आपल्या राहत्या घरातील खोलीत छताला असलेल्या लोखंडी पाईपला ओढणी बांधून गळफास घेतला. हा भयानक प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला अत्यंत तातडीने खाली उतरवलं, मात्र तोपर्यंत तिचा जागीच मृत्यू झाला होता.
महत्वाच्या बातम्या:
Virar News : मन सुन्न करणारी घटना! मोबाईल दुरुस्तीसाठी पैसे मिळाले नाहीत, विरारमध्ये अल्पवयीन मुलीनं जीवन संपवलं
आणखी वाचा
Comments are closed.