जैनांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद मुंबईभर चिघळला, नालासोपाऱ्यातही पुन्हा तेच घडलं, अन्…
जैन व्हाईट लाइन विवाद नाला सोपारा: मुंबईतील (Mumbai News) विद्याविहार (Vidyavihar) इथल्या सोसायटीमध्ये जैन कुटुंबीयांनी पांढरी पट्टी आखलेली. युट्यूबर आणि इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यानं हा मुद्दा लावून धरला. त्या सोसायटीतील वाद मिटला, पण त्यानंतर अख्ख्या मुंबईतील पांढऱ्या पट्ट्यांचा वाद चिघळला. दादर, गिरगाव, लालबाग परिसरात पांढऱ्या पट्ट्यांमुळे जैन विरुद्ध मराठी असा वाद विकोपाला गेला. अखेर पांढऱ्या पट्ट्या मिटवण्यात आल्या. अशातच त्यानंतर नालासोपारा इथल्या एका टॉवरमधील पांढऱ्या पट्ट्याचा वाद समोर आलेला. अशातच आता जैन मुंनींसाठी काढलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या वादावर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा निघाला आहे.
पांढऱ्या पट्टीचा वाद अख्ख्या मुंबईभर पेटला. त्यानंतर (White Line Controversy) आता नालासोपारा (Nala Sopara) पश्चिमेतील पाटणकर टॉवर सोसायटीतही असाच प्रकार समोर आला आहे. गुरुवारी रात्री सोसायटीच्या आवारात जैन मुनींच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगाची पट्टी रंगविण्यात आलेल्या. संबंधित प्रकाराची माहिती मिळताच मनसेचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष संजय मेहरा आणि पक्षाचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सुरुवातीला मोठा गदारोळ झालेला.
सार्वजनिक आणि सामायिक जागेत रहिवाशांची संमती न घेता धार्मिक कारणांसाठी अशा प्रकारे रंगकाम करण्यात आल्याचा आक्षेप मनसे कार्यकर्त्यांनी नोंदवला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत प्रकरण सावरलं.
घटनेची माहिती मिळताच नालासोपारा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी संबंधितांना पांढरी पट्टी हटवून मूळ स्थिती कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रात्रीच पांढऱ्या रंगावर काळा रंग मारून ती पट्टी मिटविण्यात आली. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे संभाव्य वाद टळला असून परिसरात शांतता कायम आहे.
पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका आहे तरी काय? (Prasad Vedpathak Controversy)
कंटेट क्रिएटर आणि यूट्यूबर प्रसाद वेदपाठकनं जैन धर्मगुरुंसाठी घाटकोपरमधील ‘कैलास अव्हेन्यू’ सोसायटीच्या आवारात मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा विरोध केला होता. प्रसादच्या म्हणण्यानुसार, सोसायटीतील सदस्यांची परवानगी न घेता त्यांनी ही पांढरी पट्टी मारली होती. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा दावा त्यानं आपल्या व्हिडीओतून केला. प्रसादनं या प्रकरणाच्या विरोधात आवाज उठवला. तसेच व्हिडीओच्या माध्यमातून याची माहिती दिली. वाढत्या वादानंतर ती पांढरी पट्टी काढण्यात आली. दरम्यान, या प्रकरणानंतर त्याला धमक्या मिळत असल्याचं त्यानं सांगितलं. तसेच आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यानं ट्विट केलं होतं. हे प्रकरण इतकं व्हायरल झालं की, थेट मनसे दरबारीपर्यंत पोहोचलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
एबीपी माझाची बातमी LIVE
Raut vs Mahajan Operation Tiger : फोडाफोडी Vs तुडवातुडवी;गिरीश महाजन संजय राऊत भिडले Special Report
Comments are closed.