ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलणार, प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदेंचे शिलेदार तयार

मुंबई : एकीकडे शिवसेनेच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण (Shivsena Foundation Day) होत असून त्याचवेळी ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा होत असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंच्या आणि शिंदेच्या मेळाव्यात कोण कोण बोलणार याची यादी समोर आली आहे. त्यामुळे खासदार फुटल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार आणि त्यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन हा गोरेगावातील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. या दोन्ही ठिकाणी जोरदार तयारी करण्यात आली असून शिवसैनिक जमायला सुरूवात झाली आहे.

Uddhav Thackeray Speakers List : ठाकरेंच्या शिवसेनेतून कोण बोलणार?

  • संजय राऊत
  • आदित्य ठाकरे
  • उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Speakers List : शिंदेंच्या शिवसेनेतून कोण बोलणार?

  • गुलाबराव पाटील
  • ज्योती वाघमारे
  • रामदास कदम
  • एकनाथ शिंदे

दोन्ही शिवसेनेकडून वक्त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. असं असलं तरी नऊ पैकी सहा खासदार सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरे काय बोलणार आणि त्याला एकनाथ शिंदे काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

षण्मुखानंद सभागृह येथे शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिन पार पडणार आहे. शिवसैनिक देखील या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे. ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच बोलणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागूलं आहे. षण्मुखानंद सभागृहाबाहेर देखील वेगवेगळे आशयाचे बॅनर लावून शिवसैनिकांनी आपला राग व्यत करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिंदेंच्या मेळाव्याला मोठी सुरक्षा

दरम्यान, राज्यात राबवण्यात आलेल्या ऑपरेशन टायगरनंतर होणाऱ्या शिंदेंच्या मेळाव्याला मोठी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या मेळाव्यासाठी जवळपास 300 ते 400 पोलीस कर्मचारी तैनात असून प्रत्येकाची कडक तपासणी केली जात आहे. त्याचवेळी या मेळाव्याला काळी कपडे घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. काळी कपडे घालून येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीस माघारी पाठवत आहेत.

Shivsena Operation Tiger MP List : कोणते खासदार फुटले?

1. संजय जाधव (परभणी)

2. संजय देशमुख (यवतमाळवाशिम)

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली)

4. ओमराजे निंबाळकर (धाराशिव)

5. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी)

6. संजय दीना पाटील (ईशान्य मुंबई)

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या खासदारांची यादी : उद्धव ठाकरे कोणते खासदार?

1. अरविंद सावंत (दक्षिण) मुंबई)

2. अनिल देसाई (दक्षिण मध्य)

3. राजाभाऊ वाजे (नाशिक)

ही बातमी वाचा:

Comments are closed.