‘संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा चिंधीचोर’; ज्योती वाघमारेंचा ठाकरे गट
संजय राऊत यांच्यावर ज्योती वाघमारे: शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त (Anniversary) आज मुंबईत राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये (Nesco Center) शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचा 60 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम सायन येथील षण्मुखानंद सभागृहात होत आहे. या कार्यक्रमासाठी दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी सुरू असून, मोठ्या संख्येने शिवसैनिक (Shivsainik) उपस्थित आहेत. या वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन्ही गटांतून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. या कार्यक्रमात शिंदे गटाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Jyoti Waghmare: बाळासाहेबांच्या विचारांना दिलेली ही मानवंदना: ज्योती वाघमारे
कार्यक्रमात बोलताना ज्योती वाघमारे म्हणाल्या की, “हे वर्ष शिवसेनेसाठी महत्त्वाचे आहे, कारण शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती एक झाली पाहिजे ही संकल्पना बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली होती आणि त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात एका भिमाच्या लेकीला राज्यसभेची खासदार बनवून एकनाथ शिंदे साहेबांनी संसदेत पाठवले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना दिलेली हीच खरी मानवंदना आहे.”
Jyoti Waghmare: आमच्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ म्हणजे एकनाथ शिंदे
ज्योती वाघमारे पुढे म्हणाल्या की, “मागील काही दिवसांपासून काही लोक ‘ऑपरेशन टायगर’वरून (Operation Tiger) बेताल बडबड करत आहेत. मला त्यांना आज ठणकावून सांगायचे आहे की, ऑपरेशन टायगर म्हणजे आमच्यासाठी काही लोकांना त्या पक्षातून या पक्षात आणणे नाही. आमच्यासाठी ऑपरेशन टायगर म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे साहेब आहेत, हे महाराष्ट्राने मान्य केले आहे आणि हेच खरे ऑपरेशन टायगर आहे.”
Jyoti Waghmare on Sanjay Raut: संजय राऊत महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘चिंधीचोर’
संजय राऊत यांच्या विधानाचा समाचार घेताना ज्योती वाघमारे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. त्या म्हणाल्या, “संजय राऊत सारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतो, ‘खासदारांच्या अंगावर चिंध्या शिल्लक ठेवू नका.’ अरे बाबा, आधी तुमच्या पक्षाच्या ज्या चिंध्या होऊन इकडे तिकडे पडल्या आहेत, त्या गोळा करा आणि मग बोला. या महाराष्ट्रातील सर्वात मोठा चिंधीचोर कोणी असेल तर तो संजय राऊत आहे. संजय राऊत बोलतात आम्ही ‘ऑपरेशन तुडवा’ करणार, अरे तुम्ही ऑपरेशन तुडवा नाही, तुमच्या स्वतःच्या पापांनी ‘ऑपरेशन युबीटी बुडवा’ सुरू आहे आणि ‘ऑपरेशन काँग्रेस वाढवा’ सुरू आहे,” असा हल्लाबोल त्यांनी केला.
Jyoti Waghmare on Sanjay Raut: राडे करण्यासाठी मनगटात दम असावा लागतो
“संजय राऊत पुढे बोलतात राडे करणार; पण संजय राऊत, राडे करण्यासाठी मनगटात दम असावा लागतो आणि तो मनगटातला दम फक्त अस्सल शिवसैनिकात असतो. तुमच्यासारख्या तोंडपाटीलकी करणाऱ्यांच्या फक्त जिभेत आणि तोंडात दम आहे. बगावत करने के लिए, ऑपरेशन करने के लिए शेर का कलेजा चाहिये होता है, जो हमारे नेता एकनाथजी शिंदे साहब के पास है! पण तुमच्याकडे दुर्दैवाने कलेजा पण नाही आणि भेजा पण नाही, म्हणून तुमच्या गटाची अशी अवस्था झाली आहे,” असे देखील ज्योती वाघमारे म्हणाल्या.
Jyoti Waghmare on Sanjay Raut: हिंमत असेल तर पहिल्यांदा स्वतःचा राजीनामा द्या
“राऊत, ज्या खासदारांना तुम्ही राजीनामा द्या म्हणत आहात, जर तुमच्यात नैतिकता असेल, लाज शिल्लक असेल तर पहिल्यांदा स्वतःचा राजीनामा द्या. कारण तुम्ही ज्या राज्यसभेचे खासदार आहात, ज्यांना तुम्ही रोज शिव्या देत आहात, त्याच 40 आमदारांच्या मतांवर तुम्ही निवडून आलेले आहात. तुम्ही वाघाचे कातडे पांघरलेले लबाड लांडगे आहात. तुमच्यात हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात उतरा, मग बघू कोणात किती दम आहे. इथून पुढे औकातीत राहून बोलायचे, तोंड सांभाळून बोलायचे. नाहीतर तोंड फोडायचं कसं असतं, ते शिवसैनिकांना कोणी शिकवायची गरज नाही,” असा जाहीर इशारा ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांना दिला आहे.
आणखी वाचा
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Comments are closed.