ओमराजे मतदारसंघाकडे निघण्यापूर्वीच मोठी घडामोड, सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा बहाल

पुणे: धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटणाऱ्या खासदारांमध्ये असल्याचं समोर आलं आहे. ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघात जाऊन पुढील राजकीय निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय. महाराष्ट्र सरकारकडून ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटणाऱ्या सर्व खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कालच पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागला असून या खटल्यातील आरोपींना देखील माफीच्या साक्षीदाराच्या जबाबावर संशय व्यक्त करत निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर आज धाराशिवच्या दिशेनं पुण्यातून निघणार आहेत. यावेळी खबरदारीचा भाग म्हणून ओमराजे निंबाळकर यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर यांना वाय दर्जाची सुरक्षा

खासदार ओमराजे निंबाळकर यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांची एस्कॉर्ट गाडीही देण्यात निंबाळकर यांना आली आहे.वाय दर्जाच्या सुरक्षिततेमध्ये ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत क्यूआरटीचं पथक सोबत असणार आहे.  ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. काही वेळात ओमराजे निंबाळकर पुण्यातील बाणेर परिसरात असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानावरून धाराशिवच्या दिशेने रवाना होतील.

ओमराजेंचा ठाम निर्णय, शिंदेंची शिवसेना आशावादी

ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबतच असल्याचा विश्वास पक्षातील सूत्रांकडून व्यक्त करण्यात आला आहे. ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत बिनशर्त दाखल झाले आहेत, त्यामुळे ओमराजेंचा निर्णय ठाम आहे,  असा विश्वास  शिवसेनेच्या उच्चपदस्थ वर्तुळातून व्यक्त केला जातोय. राजकीय निर्णय मतदारसंघात जाऊन चर्चा करून घेणार असं निंबाळकर म्हणाले, त्यावर ही माहिती शिवसेना सूत्रांकडून देण्यात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत शिवसेना नेतृत्व आणि केंद्र सरकार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदा ओमराजे निंबाळकर धाराशिवला जात आहेत.  खासदार फुटी नंतर आज ओमराजे दुपारी 4 वाजता धाराशिव मध्ये कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. काल रात्री उशिरा आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी भेट घेत मनधरणी केल्याची चर्चा आहे.  दोन्ही आमदारांकडून ओमराजे निंबाळकर यांच मन वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. काल पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात कैलास पाटील यांच्या फोनवरुन चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र,  आज दुपारी बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्याशी बोलून ओमराजे निंबाळकर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.

हेदेखील वाचा

Comments are closed.