ठाकरेंचे 6 खासदार फुटले, पण शिंदे गटाला एक भीती; एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा, अमित शाह यां
Shivsena Politics मराठी: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) आज (14 जुलै) दिल्ली दौऱ्यावर असून गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्याची शक्यता सूत्रांची माहिती आहे. एकदिवसीय दिल्ली दौरा करून एकनाथ शिंदे आज रात्री मुंबईत पुन्हा परतणार आहे. आज दुपारी एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल होतील. ऑपरेशन टायगर (Opration Tiger) यशस्वी झाल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच दिल्लीत येत आहेत. राज्यातील इतरही काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्व आलं आहे.
आजच्या अमित शाह यांच्यासोबत भेटीचा महत्वाचा विषय तांत्रिक बाबींचा- (मराठी Shivsena Politics)
एकनाथ शिंदेंसोबत दौऱ्यात ठाकरेंकडून शिंदेंकडे आलेले सहा खासदार देखील असतील. सर्व खासदार एकनाथ शिंदेंसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट (Amit Shah And मराठी Meet) घेण्याची शक्यता आहे. NDA चे घटक झाल्यानंतर सहा खासदार अमित शाह यांची औपचारिक भेट घेणार आहेत. आजच्या अमित शाह यांच्यासोबत भेटीचा महत्वाचा विषय तांत्रिक बाबींचा आहे. कारण अजून ठाकरे गटाकडून अपेक्षित कारवाई झाली नाही. तसेच जास्त काही बोलले देखील नाहीत. त्यामुळे आगामी लोकसभा अधिवेशनात ठाकरे गटाकडून तांत्रिक बाबींचा आधार घेऊन कारवाई केली जाऊ शकते. यामुळे सर्व सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणार आहेत. तसेच मंत्रिमंडळ विस्तार आहे, त्यात या सहापैकी एकाला राज्यमंत्रिपद मिळू शकते. त्यामुळे यासंदर्भात देखील अमित शाह यांच्यासोबत चर्चा होईल, असं सांगितलं जात आहे. तसेच एकीकडे ठाकरे गटाकडून 6 खासदारांना पत्र धाडलं असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे सर्व 6 खासदारांना सोबत घेऊन अमित शाह यांची भेट घेणार आहे. त्यामुळे राज्याचं या भेटीकडे लक्ष लागलं आहे. (मराठी Delhi Meeting)
लोकसभा अध्यक्षांनी असं कुठलंही विलिनीकरण मंजूर केलं नाही- अरविंद सावंत यांचा दावा (Arvind Sawant Shivsena UBT)
ठाकरे गटातून सहा खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले, त्यांच्या या प्रवेशाला विलिनीकरण म्हटलं गेलं, पण लोकसभा अध्यक्षांनी असं कुठलंही विलिनीकरण मंजूर केलं नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार आणि लोकसभेतले गटनेते अरविंद सावंत यांनी केला आहे. आमच्या विनंतीनुसार अध्यक्षांनी विलिनीकरणाचा आदेश काढला नाही. वेगळा गट किंवा विलिनीकरणाचा प्रश्नच नाही. त्यामुळे पक्षाचे विलीनीकरण झाल्याचा दावा घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे, असंही अरविंद सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे.
ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या खासदारांची नावं- (Shivsena MP Opration Tiger)
- संजय दिना पाटील
- ओमराजे निंबाळकर
- संजय जाधव
- संजय देशमुख
- नागेश पाटील-आष्टीकर
- भाऊसाहेब वाकचौरे
एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण, VIDEO:
संबंधित बातमी:
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Comments are closed.