वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली

वाशिम : उत्तर प्रदेश पासिंगची मारुती बलेनो कार क्रमांक UP 16 BN 0134 पोलीस (Police) स्टेशन हद्दीत येऊन थांबते. त्यातून 29 वर्षीय तरुण आपल्या एक दीड वर्षीय बाळ कडेवर घेऊन आणि अनुक्रमे अडीच व चार वर्षीय दोन बाळांना घेऊन कारंजा  शहर पोलिसांच्या समोर जाऊन उभ राहतो आणि सांगतो की, साहब मैने मेरे पत्नी की हत्या कर दी  है.. और लाश गाडी मे  है. हे  शब्द पोलिसाच्या कानावर पडताच कारंजा शहर (वाशिम) पोलीस स्तब्ध झाले. कर्तव्यावरील सर्व पोलिसांनी गाडीकडे धाव घेत पाहणी सुरु केली. त्यावेळी, घटनाक्रम ऐकून पोलिसांचेही मन सुन्न झाले.

समोर आलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरुन पोलिसांनी कार बघताच पोलिसांना धक्का बसला. कारण, ड्रायव्हर सीटच्या बाजूच्या समोरच्या सीटवर एका 24 वर्षीय महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेला होता. ती मृतक व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून हसीना बानो होती. पोलिसांसमोर हजर झालेल्या व्यक्ती सलमान खान नेक खान या तरुणाची ती पत्नी. पोलिसांनी सलमानला  विश्वासात घेत काय… घटना  घडली, याबद्दल विचारणा केली. त्यानंतर, मृतदेह सरकारी रुग्णालयाचा  शवविच्छेदन गृहाकडे  पाठवण्यात आला. सलमान खानला ताब्यात घेत नेमका घटनाक्रम आणि घटनास्थळी नेत काय घडलं, याबद्दल विचारणा केली. सलमानने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र, पोलिसांनी अधिक विचारणा करताच चारित्र्याच्या संशयावरुन होणाऱ्या वादातून टायर खोलण्याच्या पान्ह्याने वार करत हा अनर्थ घडल्याचे आरोपी सलमानने पोलिसांना सांगितले. उत्तरप्रदेशवरुन जबलपूर ते नागपूर अंतर कापत अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावरुन जवळपास 70 किलोमीटरचा प्रवास पार करताना कारंजा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सलमानने कार वळवली. पोलिसांना झालेला प्रकार सांगितला, ही घटना ऐकून पोलिसांचेही मन सुन्न झालं. पोलिसांना बीएनएस नुसार कलम 103 (1) नुसार गुन्हा दाखल केला असून सलमान सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

काय करतो आरोपी सलमान?

सलमान खान नेक खान हा 29 वर्षीय युवक उत्तर प्रदेशच्या नोएडा रा .कालौंन ता. दादरी येथील खासगी बांधकाम व्यवसायिक ठेकेदार आहे. सलमनचा विवाह हसीना बानो सोबत 16 नोव्हेंबर 2020 रोजी झाला होता. सलमान आपली पत्नी हसीना बानो (अंदाजे वय 24 वर्षे) आणि तीन लहान चिमुकल्यांना घेऊन काही कामानिमित्त मुंबईकडे निघाला. दरम्यान, पत्नी हसीना बानो आणि सलमान यांच्यात शब्दिक भांडण झाले, त्यानंतर सलमानने तिन्ही लहान मुलांना कारच्या मागच्या सीटवर झोपवून पत्नी हसीना बानो हिच्या डोक्यात अवजड वस्तूने वार केले. मात्र, यामध्ये हसीना मृत न झाल्याने हसीनाच्या गळ्यात असलेल्या ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. हत्येनंतर सलमानने अनेक तास वाहनातून पत्नीचा  मृतदेह विविध ठिकाणी फिरवला. त्यानंतर, समृद्धी महामार्गावर 70 किमी अंतरावरील कारंजा  शहर पोलीस स्टेशनचा पत्ता विचारत विचारत  मृतदेह असलेली कार आणि तीन चिमुकल्यांसह तो कारंजा शहर पोलीस ठाण्यात पोहोचला. येथे त्याने हत्येची कबुली दिली. मात्र, पोलीस तपासात विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी सखोल चौकशीनंतर सलमान विरुद्ध गुन्हा दाखल केला.

मन हेलावून टाकणारी घटना

दरम्यान, सलमानच्या गावातील काही नागरिकांना हे प्रकरण कळताच ते भेटीसाठी कारंजा शहरात पोहचले. रागाचा एक क्षण संपूर्ण परिवाराला कसा उध्वस्त करू शकतो हे काल कारंजाजवळ घडलेल्या घटनेवरून लक्षात येते. रागाच्या भरात केलेल्या कृत्याने तीन लहान चिमुकले अनाथ झाले, आरोपी सलमान जेरबंद झाला. तर पत्नी यमसदनी गेली. आरोपीला केलेल्या घटनेचा पश्चाताप होईल, मात्र घडलेली घटना समाज मनाला  हेलावून टाकणारी आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक

Comments are closed.