देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या…

अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे केंद्रीय नेतृत्व दिल्लीत बोलावून घेणार, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत केंद्रीय मंत्री होणार, असा चर्चाही सातत्याने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना विचारणा केली असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नाही, आम्हाला, मला महाराष्ट्रातच राहायचं आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. त्या शुक्रवारी पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांनी दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरु असणाऱ्या विद्यार्थी आंदोलनाबाबतही सविस्तर भाष्य केले. (Maharashtra Politics news)

आंदोलन जोपर्यंत नीट पेपरफुटीबाबत आहे, तोपर्यंत ते योग्य आहे. सरकार पडद्यामागे काम करत होते, आता त्याचे परिणाम दिसत आहेत. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्ट, शिक्षा वाढवणे आणि अन्य बदल आणले जात आहेत. विद्यार्थ्यांना अपेक्षित आहे, तशी पेपरफुटी नको व्हायला, त्यांची मेहनत वाया जाता कामा नये, त्यांच्यावर अन्याय नको व्हायला. यापुढे तसं होणार नाही, याची काळजी सरकार  घेत आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले.

यावेळी अमृता फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या रविवारी मुंबईत होऊ घातलेल्या मोर्चाबाबतही भाष्य केले. त्यांनी म्हटले की, ते एकत्र येऊन काही करत आहेत, हे चांगलं आहे. इतके दिवस ते वेगळे होते. ती गोष्ट सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे. जंतरमंतरवरील आंदोलनात पोलिसांवर काही समाजकंटकांनी वार केला, काही मुलांवरही वार झाला. हा प्रकार निंदनीय आहे. तो काळा क्षण होता. आंदोलनातील मुलींशी कुठेही गैरवर्तन झाले असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

Raj Thackeray and Uddhav Thackeray Morcha: राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

मला असं वाटतं की, सगळ्यांना लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. हा मोर्चा होत आहे, त्याच्याशी विद्यार्थ्यांशी काही घेणेदेणं आहे, याची शक्यता कमी आहे. राजकारणात आपली जागा पुन्हा कशी तयार करता येईल, यासाठी हा प्रयत्न अधिक, तरीदेखील माझ्या शुभेच्छा आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

आणखी वाचा

CM Devendra Fadnavis in Pandhapur: देवेंद्र फडणवीसांनी मोदीजींसाठी विठुरायाकडे काय साकडं घातलं, ठाकरे बंधूंनाही टोला, पंढरपूर कॉरिडोअर पूर्ण होण्याची डेडलाईनही सांगितली

‘धिक्कार आहे अशा देशाचा जिथे असे …’; उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले, ट्रोलर्सला सुनावलं!

Comments are closed.